Homeडेली पल्सतटरक्षक दलाने केली...

तटरक्षक दलाने केली भारतीय ‘रोझरी’ची सुटका!

भारतीय तटरक्षक दलाने काल कर्नाटकातील कारवारजवळच्या समुद्रात अंदाजे 215 सागरी मैल अंतरावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे संकटात सापडलेल्या आयएफबी रोझरी, या भारतीय मासेमारी नौकेची यशस्वीपणे सुटका केली. आयएफबी रोझरी या नौकेने 13 एप्रिल 2024 रोजी आपत्कालीन मदतीसाठी दिलेल्या हाकेला भारतीय तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले या नौकेने त्वरित प्रतिसाद दिला आणि प्रतिकूल हवामानावर मात करत संकटग्रस्त नौकेशी संपर्क प्रस्थापित केला.

संकटग्रस्त नौकेवर पोहोचल्यावर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील बोर्डिंग पथकाने नौकेचे इंजिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निष्फळ ठरल्यावर तटरक्षक दल जिल्हा मुख्यालयाच्या (कर्नाटक) आणि मत्स्य विभागाच्या सहकार्याने ही मासेमारी नौका कारवारच्या दिशेने नेण्यात आली. नंतर ती आयएफबी लक्ष्मी नारायण यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली. त्यांनी ती सुरक्षितपणे कारवार बंदरात नेली. 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content