Saturday, February 8, 2025
Homeएनसर्कलभारतीय नौदलाची महासागर...

भारतीय नौदलाची महासागर नौकानयन स्पर्धा बुधवारपासून!

भारतीय नौदल हे भारतातील महासागर नौकानयन स्पर्धांमध्ये आघाडीवर आहे. समुद्रातील याच साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदलाने दिल्ली स्थित नौदल मुख्यालयाच्या (NHQ) अंतर्गत येणाऱ्या इंडियन नेव्हल सेलिंग असोसिएशन (INSA) अर्थात भारतीय नौदल नौकानयन संघटनेच्या नेतृत्त्वाखाली कोची ते गोवा ही आंतर-कमांड महासागर नौकानयन स्पर्धा 22 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित केली आहे.

ही स्पर्धा सदर्न नेव्हल कमांड (HQSNC) मुख्यालयाने कोची एएसडब्ल्यू स्कूल येथे स्थित भारतीय नौदलाच्या ऑफशोर सेलिंग क्लब आणि आयएनएस गोवा मांडोवी येथे स्थित ओशन सेलिंग नोड यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे.

भारतीय नौदलाची बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या चार 40 फूट नौकानयन जहाजे (INSVs) या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जहाजांना कोची ते गोवा येथील नौदल स्थळांच्या स्टार्ट पॉईंट दरम्यानचे अंदाजे 360 नॉटिकल मैल (nm) एवढे अंतर सुमारे पाच दिवसात पार करावे लागेल.

या नौकानयन मोहिमेसाठी पुरेसा सागरी नौकानयन अनुभव असलेल्या स्वयंसेवकांमधून दलाची निवड केली जाते. समुद्री नौकानयन हा अत्यंत कठीण साहसी खेळ आहे. भारतीय नौदल आपल्या आवश्यक समुद्री कौशल्यांचा आणि यंत्रसामग्री व्यवस्थापन कौशल्यांचा सन्मान करण्याबरोबरच आपल्यात साहसाची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या जवानांच्या जोखीम-व्यवस्थापन क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रकारच्या सागरी मोहिमा राबवते.

या स्पर्धेत भारतीय नौदलाच्या निवड झालेल्या चार जहाजांवरील आठ महिला अधिकारी/अग्नीवीरांसह 32 कर्मचारी सहभागी होतील. भारतीय नौदलाच्या प्रत्येक नौकानयन जहाजावर (INSV) नौदलाच्या तीनही कमांडचे आणि राष्ट्रीय मुख्यालय तसेच अंदमान आणि निकोबार कमांडचे असे मिळून एकूण आठ कर्मचारी असतील. या स्पर्धेत सहभागी होणारा सर्वाधिक ज्येष्ठ कर्मचारी म्हणजे कमांडर असतो आणि सर्वात कनिष्ठ कर्मचारी हा अग्नीवीर दर्जाचा असतो.

भारतीय नौदलाला असा विश्वास वाटतो की यासारख्या लहान लहान जहाजांवर नौकानयन करणे हा आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये “अवर्णनीय अशी सागरी संवेदना” निर्माण करेल तसेच सुरक्षित आणि यशस्वी समुद्री प्रवासाचा अविभाज्य घटक असलेल्या निसर्गातल्या सर्व घटकांबद्दल त्यांच्यात आदर निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा नौदल कर्मचार्‍यांमध्ये धैर्य, सौहार्द, सहनशक्ती आणि एस्प्रिट-डी-कॉर्प्स अर्थात जवानांमध्ये गौरवाची भावना आणि परस्पर विश्वासाची मूल्ये जागृत करण्याचे काम करतात.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content