Homeचिट चॅटभारतीय कुटीरोद्योगाच्या 'मेगा...

भारतीय कुटीरोद्योगाच्या ‘मेगा सेल’ प्रचारमोहीमेचे उद्घाटन!

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम असलेल्या सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIC) अर्थात भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ मर्यादित आणि ओपन  नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्ससाठी (ONDC) यांच्यात झालेल्या सहकार्य कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय केंद्रीय कुटीरोद्योग महामंडळाने आपल्या नवी दिल्ली जनपथ येथील जवाहर व्यापारी भवन शोरूममध्ये एका भव्य ‘मेगा सेल’ प्रसार मोहिमेचे आयोजन केले होते.

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांनी, ओएनडीसी (ONDC) डिजिटल प्लॅटफॉर्मवर सीसीआयसी (CCIC) ची नोंदणी केली तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयातले सहसचिव आणि भारतीय केंद्रीय उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजय गुप्ता यांच्या उपस्थितीत “मेगा सेल” चे उद्घाटन केले. यावेळी ओएनडीसी (ONDC) चे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी टी. कोशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सीसीआयसी आणि ओएनडीसी यांच्यातला सहकार्य करार म्हणजे भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाची बाजारपेठेतील अस्तित्व वाढवणे आणि ओएनडीसी नेटवर्कच्या विविध खरेदीदार ॲप्स च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत आपल्या उत्कृष्ट दर्जाची हस्तशिल्प आणि हातमाग उत्पादने पोचवण्याची कटीबद्धता दर्शवते.

भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाने कारागीर आणि विणकरांना मदत करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फोर लोकल उपक्रमांमध्ये आपले योगदान देण्यासाठी 08 ते 23 जुलै 2023 या कालावधीत ‘मेगा सेल’ प्रचार मोहीम आयोजित केली आहे. भारतातील पारंपारिक कला, हस्तकला आणि हस्तकला करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेत, हस्तकला आणि हातमागाच्या वस्तूंवर 30% पर्यंत सूट देण्यात आली आहे. या सेल मधील प्रत्येक उत्पादन अस्सल, वेगळेपण जपणारे आणि उत्तम दर्जाचे असेल तसेच येथील प्रत्येक उत्पादन सत्यता, गुणवत्ता आणि पैशाच्या मूल्याची हमी देणारे असेल. ही प्रचार विक्री मोहीम, 23 जुलै 2023 सकाळी 10:00 ते संध्याकाळी 07:00 (सर्व दिवस) पर्यंत सुरू राहील.

भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ मर्यादित (CCIC), हा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा सार्वजनिक क्षेत्रातील एक असून तो आपल्या नवी दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये असलेल्या शोरूम च्या माध्यमातून सर्वोत्तम आणि अस्सल भारतीय हातमाग आणि हस्तकला उत्पादनांच्या जाहिरात आणि किरकोळ विपणनाचे कार्य करते.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content