Homeब्लॅक अँड व्हाईटसंयुक्त सरावासाठी भारतीय...

संयुक्त सरावासाठी भारतीय सैन्य दल थायलंडला

संयुक्त लष्करी सराव ‘मैत्री’च्या 13व्या सत्रात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्य दल नुकतेच थायलंडला रवाना झाले. हा संयुक्त लष्करी सराव थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिराप्राकन फोर्ट येथे 1 ते 15 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याआधी सप्टेंबर 2019मध्ये मेघालयमधील उमरोई येथे अशाप्रकाचा संयुक्त सराव झाला होता.

भारतीय सैन्य दलात एकूण 76 सैनिकांचा समावेश असून त्यामध्ये मुख्यत्वे लडाख स्काउट्सच्या तुकडीचे जवान आणि इतर संरक्षण दले आणि सेवांमधील कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. रॉयल थायलंड सैन्यदलामध्ये प्रामुख्याने पहिल्या तुकडीतील चौथ्या डिव्हिजनच्या 14 इन्फंट्री रेजिमेंटमधील 76 जवानांचा समावेश आहे. भारत आणि थायलंड यांच्यात लष्करी सहकार्य वृद्धींगत करण्याचे मैत्री, या संयुक्त सरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत जंगल आणि शहरी पर्यावरणातील घुसखोरी / दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराची क्षमतावृद्धी होईल. या सरावामध्ये उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त व्यवस्थापन आणि संयुक्तपणे विविध सामरिक कवायतींचा समावेश असेल.

या सरावादरम्यान होणाऱ्या सामरिक कवायतींमध्ये संयुक्त परिचालन केंद्राची निर्मिती, गुप्तचर आणि देखरेख केंद्राची स्थापना, ड्रोनचा वापर आणि ड्रोनविरोधी यंत्रणा, लँडिंगसाठी जागेची निश्चिती, लहान तुकडी रणनीती आणि एक्सट्रॅक्शन, स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स, घेराबंदी आणि शोधमोहीम, रूम इंटरव्हेंशन ड्रिल्स आणि बेकायदेशीर बांधकामे नष्ट करणे यांचा समावेश असेल. मैत्री सराव, दोन्ही देशांच्या लष्कराला त्यांच्या संयुक्त कारवाईसाठी रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यामधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल. या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतरकार्यक्षमता, सौहार्द आणि सद्भाव वाढवण्यास मदत होईल.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content