Homeबॅक पेजलमीतीए युद्धसरावासाठी भारतीय...

लमीतीए युद्धसरावासाठी भारतीय लष्कराची तुकडी सेशेल्सकडे

‘लमीतीए-2024’, या संयुक्त युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडी काल सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) रवाना झाली. सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्यादरम्यान दहाव्यांदा हा युद्धसराव होत आहे. आजपासून 27 मार्चपर्यंत सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्धसराव केला जाणार आहे.

क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव 2001पासून सेशेल्समध्ये घेतला जातो. भारतीय लष्कराची गोरखा रायफल्स व सेशेल्स यांचे प्रत्येकी 45 जवान यामध्ये सहभागी होत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतिसेना मोहीम सनदी’च्या सातव्या भागाअंतर्गत निमशहरी भागात अर्धपारंपरिक कारवायांदरम्यान परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याच्या क्षमता वाढवणे, हा या युद्ध सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे शांती मोहिमांच्या वेळी उभय पक्षांदरम्यान सहकार्य व परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याचे कौशल्य वाढीस लागणार आहे. उभय देशांच्या लष्करांदरम्यान द्विपक्षीय लष्करी संबंध वृद्धींगत होण्यास अनुभवांचे, कौशल्यांचे व चांगल्या कार्यपद्धतीचे आदानप्रदान होण्यासही या युद्धसरावामुळे हातभार लागणार आहे.

निमशहरी वातावरणात उत्पन्न होऊ शकणारे धोके लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी, प्रशिक्षण देऊन, नियोजन करून, डावपेच व कवायती या स्वरूपात दोन्ही पक्ष संयुक्तपणे त्याची अंमलबजावणी करतील. या 10 दिवसीय संयुक्त युद्धसरावात क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम, लढाईविषयक चर्चा, व्याख्याने व सादरीकरणे समाविष्ट असून दोन दिवसांच्या सांगता समारंभाने त्याचा समारोप होईल.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content