Homeबॅक पेजलमीतीए युद्धसरावासाठी भारतीय...

लमीतीए युद्धसरावासाठी भारतीय लष्कराची तुकडी सेशेल्सकडे

‘लमीतीए-2024’, या संयुक्त युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडी काल सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) रवाना झाली. सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्यादरम्यान दहाव्यांदा हा युद्धसराव होत आहे. आजपासून 27 मार्चपर्यंत सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्धसराव केला जाणार आहे.

क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव 2001पासून सेशेल्समध्ये घेतला जातो. भारतीय लष्कराची गोरखा रायफल्स व सेशेल्स यांचे प्रत्येकी 45 जवान यामध्ये सहभागी होत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतिसेना मोहीम सनदी’च्या सातव्या भागाअंतर्गत निमशहरी भागात अर्धपारंपरिक कारवायांदरम्यान परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याच्या क्षमता वाढवणे, हा या युद्ध सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे शांती मोहिमांच्या वेळी उभय पक्षांदरम्यान सहकार्य व परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याचे कौशल्य वाढीस लागणार आहे. उभय देशांच्या लष्करांदरम्यान द्विपक्षीय लष्करी संबंध वृद्धींगत होण्यास अनुभवांचे, कौशल्यांचे व चांगल्या कार्यपद्धतीचे आदानप्रदान होण्यासही या युद्धसरावामुळे हातभार लागणार आहे.

निमशहरी वातावरणात उत्पन्न होऊ शकणारे धोके लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी, प्रशिक्षण देऊन, नियोजन करून, डावपेच व कवायती या स्वरूपात दोन्ही पक्ष संयुक्तपणे त्याची अंमलबजावणी करतील. या 10 दिवसीय संयुक्त युद्धसरावात क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम, लढाईविषयक चर्चा, व्याख्याने व सादरीकरणे समाविष्ट असून दोन दिवसांच्या सांगता समारंभाने त्याचा समारोप होईल.

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content