Homeएनसर्कलऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन...

ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात भारत प्रथमच सहभागी

भारत या वर्षी प्रथमच ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात सहभागी होत आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय शिष्टमंडळ ऍनिमेशन  उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत एनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात जगभरातील प्रेक्षकांसाठी ऍनिमेशन आणि व्हीएफएक्स  सामग्री निर्मितीतील भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देत आहेत.

भारत अलीकडे जगभरातील निर्मात्यांसाठी व्हीएफएक्स आणि ऍनिमेशन सामग्रीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयाला आला आहे. 2021 मध्ये भारतातील ऍनिमेशन आणि व्हीएफएक्स बाजारपेठेचे मूल्य 109 अब्ज रुपये राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, यापैकी व्हीएफएक्स व्यवसाय केवळ 50 अब्ज रुपये असेल. E&Y अहवालानुसार 2024 पर्यंत हा आकडा 180 अब्ज रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर या क्षेत्रातील आपली क्षमता देशाने प्रदर्शित केल्यामुळे ऍनेसीमधील भारताच्या सहभागाला अधिक महत्त्व आहे.

भारताच्या सहभागाबद्दल बोलताना चंद्र  म्हणाले, भारतातील ऍनिमेशन , गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्र जागतिक दर्जाची तंत्रे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून, प्रचंड प्रतिभावान व्यावसायिकांच्या समूहासह प्रगती करत आहे.भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जो भारतात एव्हीजीसी सामग्री बनवण्यासाठी परदेशी कंपन्यांना रोख स्वरूपात प्रोत्साहन देत आहे. भारतात चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनासारखेच हे आहे. याचा फायदा घेण्याची कंपन्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. एक देश म्हणून आम्ही उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच भारतात निर्मिती-पूर्व आणि निर्मिती नंतरच्या कामांना देखील मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत आहे.

महोत्सवात चंद्र यांनी ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवाचे संचालक मायकेल मारिन यांची भेट घेतली आणि एनेसीमध्ये भारताचा सहभाग बळकट करण्याच्या शक्यता तसेच  भारतात ऍनिमेशन महोत्सव आयोजित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील संभाव्य सहकार्याबाबत  चर्चा केली. चंद्र यांनी सरस्वती यंत्राच्या संकल्पनेवर आधारित इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले आणि 2023 मध्ये प्रतिष्ठित ऍनेसी महोत्सव स्पर्धेत प्रवेश मिळवलेल्या भारतीय सर्जनशील समुदायाशी संवाद साधला. युवा निर्माते अरविंद जीना, निकिता प्रभुदेसाई जीना, उपमन्यू भट्टाचार्य, कल्प संघवी यांच्यासह सरस्वती वाणी बालगम, किरीट खुराना, बिरेन घोष, अनिल वानवारी आणि अॅनी दोशी यांसारखी उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळी या महोत्सवात उपस्थित होती.

याशिवाय चंद्र यांनी इतर देशांतील प्रतिनिधींशी संवाद साधला आणि एव्हीजीसी क्षेत्राशी संबंधित मंत्रालयाच्या विविध उपक्रमांविषयी तसेच भारत सरकारने या क्षेत्रात व्यवसाय सुलभतेसाठी दिलेले प्रोत्साहन यावर चर्चा केली.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content