Homeटॉप स्टोरीभारत जगात दोन...

भारत जगात दोन नंबरचा अल्युमिनियम उत्पादक

चुनखडी यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक, तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज उत्पादक देश आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत देशातील लोह खनिज, चुनखडी यासारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ होत आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत देशातील लोह खनिज, चुनखडी यासारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ होत आहे.

विद्यमान आर्थिक वर्षात देशातील लोह खनिज आणि चुनखडी उत्पादनात होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीतून या खनिजांच्या पोलाद आणि सिमेंट या वापरकर्त्या उद्योगांकडून होणारी सशक्त मागणी दिसून येते.अल्युमिनियम उत्पादनातील वाढीसोबत, हा वृद्धीचा कल उर्जा, पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोटिव्ह तसेच यंत्रसामग्री या अल्युमिनियमच्या वापरकर्त्या क्षेत्रातील सातत्यपूर्ण सशक्त आर्थिक घडामोडींकडे निर्देश करतो.

मूल्यानुसार देशातील एकूण एमसीडीआर अर्थात खनिज संवर्धन आणि विकास नियमांतर्गत होणाऱ्या खनिज उत्पादनात लोह खनिज आणि चुनखडी याचा वाटा सुमारे 80%पर्यंत झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये देशात 275 दशलक्ष टन लोह खनिज तर साडेचारशे दशलक्ष टन चुनखडीचे उत्पादन झाले. तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशातील बिगर-लोह धातू क्षेत्राचा विचार करता, आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मधील प्राथमिक अल्युमिनियम उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच काळातील उत्पादनापेक्षा 1.2% ची वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते जून) मधील 10.28 लाख टन अल्युमिनियम उत्पादनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मधील अल्युमिनियम उत्पादन 10.43 लाख टन अधिक उत्पादन आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते जून) मध्ये देशात 72 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन झाले होते त्यात 9.7%ची वाढ दर्शवत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मध्ये 79 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन झाले. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते जून) मध्ये देशात झालेल्या 114 दशलक्ष टन चुनखडी उत्पादनात 1.8%ची वाढ होऊन आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मध्ये 116 दशलक्ष टन चुनखडीचे उत्पादन झाले. मँगनीज धातू उत्पादनाने आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मध्ये 11% ची उसळी घेतली असून गेल्या वर्षी याच काळात झालेल्या 0.9 दशलक्ष टन मँगनीज उत्पादनात वाढ होऊन ते 1.0 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content