Homeडेली पल्स‘समृद्धी परिषद’ अभियानाचे...

‘समृद्धी परिषद’ अभियानाचे आयआयटी रोपार येथे उद्घाटन!

डीपटेक अर्थात गहन तंत्रज्ञानाला गती देणाऱ्या ‘समृद्धी परिषद’ या अभियानाचे उद्घाटन पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी आणि जल तंत्रज्ञानातील अभिनव तंत्रज्ञानाला गती देणारा समृद्धी हा कार्यक्रम बाजारपेठ, संशोधन, नवोन्मेष आणि विकास यांन धोरणात्मक पद्धतीने गती देणारा म्हणजे आयसीपीएस स्टार्ट अप उद्योगांसाठी सुरु करण्यात आलेला व्यापक उपक्रम आहे. आंतरशाखीय सायबर-भौतिक प्रणालींवर (एनएम-आयसीपीएस) आधारित राष्ट्रीय अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या आयआयटी रोपारमधील iHub AwaDH या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाचे ज्येष्ठ सल्लागार तसेच विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे सचिव डॉ.अखिलेश गुप्ता यांनी भारताला तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी एनएमआयसीपीएस करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. आयसीपीएसशी संबंधित एनएमच्या अभियान संचालक डॉ.एकता कपूर यांनी कृषीविषयक पायाभूत सुविधा, आरोग्य, संरक्षण आणि पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सीपीएस तंत्रज्ञानविषयक हस्तक्षेपांना चालना देणाऱ्या या अभियानाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला.

देशभरात एनएमआयपीएसच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यात डीएसटी बजावत असलेली महत्त्वाची भूमिका या कार्यक्रमात अधोरेखित झाली. या अभियानाने 311 विविध तंत्रज्ञाने, 549 तंत्रज्ञानविषयक प्रकल्प यांच्या निर्मितीला मदत केली तसेच 1613 सीपीएस संशोधन केंद्रांची उभारणी करून 60000 हून अधिक सीपीएस कौशल्य केंद्रांच्या निर्मितीत योगदान दिले.

आयआयटी रोपार मधील iHub AwaDH या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला 46 गुंतवणूक भागीदारांचे पाठबळ लाभले असून 50 पेक्षा जास्त परीक्षक सदस्यांनी स्टार्ट अप उद्योगांचे मूल्यांकन करून त्यांना मार्गदर्शन केले.

Continue reading

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची...

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...
Skip to content