Saturday, July 27, 2024
Homeबॅक पेज१० वर्षांत मोदी...

१० वर्षांत मोदी सरकारने कामगारांना देशोधडीला लावले!

देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे. कामगारशक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगारहिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण दिले. परंतु मागील १० वर्षांतील नरेंद्र मोदी सरकाने मात्र कामगारहिताचे कायदे बदलून उद्योगपतीधार्जिणे कायदे बनवले व कामगारांना देशोधडीला लावले, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

प्रदेश काँग्रेसचे मुंबई कार्यालय, टिळक भवन येथे आज राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचा (इंटक) मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात लाखो कामगार देशोधडीला

लागले. छोटे, मध्यम उद्योग बंद पडले. मोदी सरकारला कामगारांची चिंता नाही. त्यांना चिंता आहे ती फक्त मुठभर उद्योगपतींची. महागाईचा सर्वात जास्त परिणाम कामगारांवर होतो. १० वर्षांत महागाई गगनाला भिडली. पण मोदी सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. मोदी सरकार शेतकरी, कामागार व गरिबांचे नाही तर मालकधार्जिणे सरकार आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. मोदी खोट्यांचे सरदार आहेत. काँग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल अपप्रचार करत आहेत. १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता असा खोटा आरोप मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होत असल्याने नरेंद्र मोदींचा भ्रमनिरास झाला आहे. या निराशेतून ते काहीही बोलत आहेत. लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून कामगारांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही चेन्नीथला यांनी केले.

या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, शिवसेना नेते व आमदार सचिन अहिर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, गोविंदराव मोहिते, दिवाकर दळवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या समन्वयक प्रगती अहिर व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!