Homeबॅक पेज'उदार शक्ती'नंतर भारतीय...

‘उदार शक्ती’नंतर भारतीय हवाई दलाची तुकडी मायदेशी

मलेशियात ‘उदार शक्ती 2024’, या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी काल मायदेशी परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव पाच ते नऊ ऑगस्टदरम्यान मलेशियातील कुआंतान इथे झाला. या संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह भाग घेतला.

या सरावादरम्यान भारतीय हवाई दलाची Su-30MKI लढाऊ विमाने ही रॉयल मलेशियन हवाई दलाच्या Su-30MKM या लढाऊ विमानांसोबत सहभागी झाली. त्यामुळे दोन्ही हवाई दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कार्यपद्धतीतील नियमांची ओळख होऊन समन्वयाने काम करण्याच्या क्षमतेत वाढ झाली. तसेच Su-30 या लढाऊ विमानांच्या परिचालनातील कार्यक्षम वाढवण्याच्या उद्देशाने दोन्ही हवाई दलातील तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञांनी एकमेकांच्या देखभाल कार्यपद्धती जाणून घेतल्या.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content