Homeचिट चॅटश्री गणेशमूर्ती कार्यशाळेला...

श्री गणेशमूर्ती कार्यशाळेला बालगोपाळांचा प्रतिसाद

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्त्वाखालील विघ्नेश आर्ट्सच्या विद्यमाने येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा जय महाराष्ट्र नगर येथील फुलपाखरू उद्यानातील प्रशस्त सभागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला चार वर्षांपासून बारा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

भरत घाणेकर यांनी श्रीफळ वाढवून या कार्यशाळेचे उद्घाटन केले तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, श्याम कदम, सेंट जॉन शाळेच्या प्रिन्सिपॉल रिना संतोष आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर जमशेटजी जिजीभॉय कला महाविद्यालयातील प्रथमेश पाटील, पूर्वा पालांडे, श्रेया गरासिया, अमोल तांबे, शीतल घाणेकर या कला शिक्षकांनी बालगोपाळांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला लक्ष्मीकांत नाईक, रमेश घाणेकर, संदेश कोलापटे, संजय घाडगे, सिद्धेश्वर वाघचौरे, नरेंद्र माली, अशोक पडीयार, हरिश्चंद्र कत्वांकर, बिपिन सावंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री नाईक, हृदया घाणेकर, रोहित गुप्ता, ओमकार कणसे, गीत घाणेकर, निशांत पेडणेकर, राहुल वाडीकर, पार्थ नगवदरिया आदींनी परिश्रम घेतले. सुमारे ११० बालगोपाळांनी या कार्यशाळेत भाग घेतला. या बालगोपाळांनी दुपारी बारा ते दोन या वेळेत उत्कृष्ट गणेशमूर्ती घडविल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रिन्सिपॉल रिना संतोष आणि वरुण घाणेकर यांचा त्रिवेदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content