Wednesday, February 5, 2025
Homeमुंबई स्पेशलमहालक्ष्मी रेसकोर्सवर पुन्हा...

महालक्ष्मी रेसकोर्सवर पुन्हा दिसणार अश्वशर्यती!

मुंबई महानगराची आंतरराष्ट्रीय ख्याती जपणारे रेसकोर्स नव्याने दिमाखात उभे ठाकणार आहे. पुन्हा या रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यतींचा आनंद लुटता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत महालक्ष्मी रेसकोर्सवर अश्वशर्यती होणार हे निश्चित झाले. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबतर्फे पूर्वीपासून येथे घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते.

कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा तसेच तो विहित कालावधीत पूर्ण करण्याचे शासनाने ठरविले. या संदर्भात मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्यात सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. महालक्ष्मी रेसर्कोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांच्या ताब्यात पूर्वी असलेल्या एकूण २११ एकर भूखंडापैकी अंदाजे ९१ एकर शासकीय भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे ०१ जून २०२३पासून ३१ मे २०५३, या ३० वर्षांच्या महत्तम कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास अटी व शर्तीमह मान्यता देण्यात आली. याद्वारे, मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना यापूवों देण्यात आलेल्या २११ एकर भूखंडापैकी अंदाजे ९१ एकर भूभाग ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क उभारण्याकरिता मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांच्या ताब्यात असलेली उर्वरित १२० एकर जागा या संस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करून द्यायची आहे.

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांच्या क्लब स्टेबल्स आणि इतर संरचनांनी व्यापलेल्या बांधीव क्षेत्राकरीता १४.०३.२०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयामध्ये स्पष्ट केल्यानुसार जमिनीच्या वार्षिक मूल्य दरतक्त्यातील (रेडीरेकनरने येणाऱ्या) किंमतीच्या १०% रकमेवर १% या प्रचलित दराने भाडेपट्टा आकारणी करण्यात यईल. उर्वरित मोकळी जागा अश्व शर्यतीच्या दिवसांव्यतिरिक्त इतर दिवसांकरिता सार्वजनिक वापराकरिता उपलब्ध राहणार असल्याने या जागेवर सवलतीच्या दराने भाडेपट्टा आकारण्यात येणार आहे.

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांच्यावर दरवर्षी आकारण्यात येणारी दरवाढ ३%पेक्षा जास्त नसेल. मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना भाडेपट्टा कराराने देण्यात आलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स येथील शासकीय भूखंडावर ०१.०१.२०१७ ते ३१.१२.२०२३ या कालावधीकरीता अतिरिक्त भाडेपट्ट्यापोटी अनुज्ञेय होणाऱ्या फरकाची रक्कम वसूल करण्यात येणार नाही.

भाडेपट्टा कराराने दिलेल्या भूखंडावर मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांच्याद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व क्रीडेतर कार्यक्रमाकरिता प्रतीदिन आकारावयाचे अनुज्ञप्ती शुल्क (License Fee) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, दि. २३.०६.२०१७ अन्वये विहित केलेल्या धोरणानुसार क्रीडेतर कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसासाठी रु. १,५०,०००/- प्रती कार्यक्रम व एकाच आयोजकाचा तोच कार्यक्रम एकापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल तर लगतच्या प्रत्येक दिवसासाठी रु. १,००,०००/- प्रती कार्यक्रम प्रती दिन याप्रमाणे आकारण्यात येईल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content