Friday, January 10, 2025
Homeहेल्थ इज वेल्थ'एचएमपीव्ही' जुनाच! सर्दी-पडस्यासारखाच!!

‘एचएमपीव्ही’ जुनाच! सर्दी-पडस्यासारखाच!!

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून ‘एचएमपीव्ही’ व्हायरस अस्तित्त्वात असून सर्वसामान्यांना होणारी सर्दी-पडसे हा त्याचाच एक भाग असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितले. सर्वसाधारणपणे पाच वर्षांखालील मुलांना याची बाधा होऊनही गेलेली असते आणि त्यामुळे त्यांच्यात याविरोधातली प्रतिकारशक्तीही तयार झालेली असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. चीनमध्ये सध्या धुमाकूळ असलेला एचएमपीव्ही व्हायरस याच स्वरूपाचा आहे की त्यात नवीन बदल झाले आहेत, याचा अभ्यास सध्या केला जात असून सावधगिरीचा उपाय म्हणून दीर्घकालीन सर्दी-खोकला असणाऱ्या व्यक्तींनी दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांकडे जावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या व्हायरसची लक्षणे म्हणजे तीव्र स्वरूपाची सर्दी-पडसे, खोकला येणे, हलका ताप राहणे, घसा खवखवणे, नाक गळणे, नाक चोंदणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, इतर, खासकरून श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्ती यांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते. यामध्ये जास्तीतजास्त धोका म्हणजे न्युमोनियापर्यंतचा आजार होऊ शकतो. परंतु या व्हायरसला टाळण्यासाठी मास्क लावून फिरण्याची गरज नाही. सर्दी-पडसे झाले तर त्यावर घरच्याघरी नेहमीप्रमाणे उपचार करावेत. त्यातूनही बरे वाटत नसल्यास डॉक्टरकडे जावे, असे डॉक्टरांनी सांगितले.

मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एच. एम. पी. व्ही.) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आर. एस. व्ही. आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस्मध्ये वर्ष २००१मध्ये आढळला होता.

दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात या व्हायरसने बाधित कोणताही रूग्ण नाही. तरीही नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य सेवा संचालनालयाने केले आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) या विषाणूच्या साथ उद्रेकाबाबतच्या बातम्यांनंतर आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी ३ जानेवारी २०२५ रोजी याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

हे करा-
● जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
● साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
● ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहवे.
● भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
● संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

हे करू नये-
● हस्तांदोलन.
● टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
● आजारी लोकांशी जवळचा संपर्क
● डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
● सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आता माजी सैनिकांना मिळतेय व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण! 

संरक्षण मंत्रालयाच्या रिसेटलमेंट झोनने (दक्षिण कमांड) अलीकडेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी (आरओ) म्हणजेच माजी सैनिकांना नवोन्मेष आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापनावरील रिसेटलमेंट अभ्यासक्रम नुकताच सुरू केला आहे. 23 डिसेंबर 2024ला सुरू झालेला...

21 ते 29 जानेवारीदरम्यान राष्ट्रपती भवनात ‘नो एन्ट्री’!

प्रजासत्ताकदिनाचे संचलन आणि बीटिंग रिट्रीट या सोहळ्यामुळे येत्या 21 ते 29 जानेवारीदरम्यान राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवन (सर्किट-1) बंद राहणार असून सर्वसामान्य नागरिकांना तेथे भेट देता येणार नाही. त्याचप्रमाणे उद्या, 11 जानेवारी तसेच 18 आणि 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाचा सराव...

नागपूरमध्ये उद्यापासून ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा’!

नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील दक्षिणमध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा 'ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा' उद्यापासून 19 जानेवारीदरम्यान आयोजित केला जाणार आहे. या दहादिवसीय मेळ्यामध्ये विविध राज्यांची लोकनृत्यं, हस्तशिल्पप्रदर्शन त्याचप्रमाणे व्यंजनांची...
Skip to content