Homeएनसर्कलविरोधकांच्या घोषणाबाजीवर सत्ताधाऱ्यांकडून...

विरोधकांच्या घोषणाबाजीवर सत्ताधाऱ्यांकडून ‘हिन्दुस्थान’चा उतारा! 

नागपूरमधल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.., फिरसे जीतेंगे हिन्दुस्थान… अशा घोषणा देत विधानसभा दणाणून टाकली आणि चार राज्यांच्या विधानसभांच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभेतही दिसून आले.

हिन्दुस्थान

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. गळ्यात संत्र्याचे हार घालून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य पायऱ्यांपाशी आले. हातात घोषणांचे फलक घेत त्यांनी घोषणा दिल्या आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. त्यावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतल्या घोषणाबाजीचा उतारा दिला.

हिन्दुस्थान

विरोधी पक्षांनी याच विषयावर स्धगन प्रस्ताव दिला होता. पण, तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा विषय उपस्थित करत राज्य सरकारने दुष्काळसदृश असा नवाच शब्दप्रयोग वापरला आहे, याकडे लक्ष वेधले. अवकाळी पावसासह विविध आपत्तींमुळे २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पंचनामे केले जात नाहीत, याकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना सरसकट भरपाई दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हिन्दुस्थान

त्यावर अवकाळी पावसासह गारपीट तसेच चक्रीवादळासह कोणत्याही प्रकारची आपत्ती असेल तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील आणि त्यांना नुकसानभरपाई देईल, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे आणि यंदा पहिल्यांदाच २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा केली आहे. गेल्या वर्षी एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट भरपाई दिली होती आणि यंदा भरपाई देताना २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरची अट केली आहे, हे फडणवीस यांनी सांगताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content