Homeकल्चर +मराठी व्यावसायिक नाट्य...

मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ प्रथम

32व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‍जिगिषा क्रिएशन्स, या संस्थेच्या हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी नुकतीच केली आहे.

अवनीश, अथर्व, नाटकमंडळी या संस्थेच्या आमने सामने या नाटकास रुपये 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि मकरंद देशपांडे नाटकवाला आणि व्ही आर प्रॉडक्शन्स या संस्थेच्या सर, प्रेमाचं काय करायचं? या नाटकास रुपये 3 लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शन:

प्रथम पारितोषिक (रु.1,50,000/-) चंद्रकांत कुलकर्णी (नाटक-हरवलेल्या पत्त्यांचा बंगला)

द्वितीय पारितोषिक (रु.1,00,000/-) मकरंद देशपांडे (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं)

तृतीय पारितोषिक (रु.50,000/-) ‍निरज शिरवईकर (नाटक-आमने सामने)

नाट्यलेखन:

प्रथम पारितोषिक (रु.1,00,000/-) स्वरा मोकाशी (नाटक- हरवलेल्या पत्त्यांचा बंगला)

द्वितीय पारितोषिक (रु.60,000/-) ‍निरज शिरवईकर (नाटक- आमने सामने)

तृतीय पारितोषिक (रु.40,000/-) मकरंद देशपांडे (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

प्रकाश योजना:

प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)अमोघ फडके (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) किशोर इंगळे-मयुर इंगळे (नाटक- आमने सामने)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-‍ शिवाजी शिंदे (नाटक-प्रेम करावं पण जपून)

नेपथ्य:

प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) टेडी मौर्या (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) प्रदीप मुळे (नाटक-तू म्हणशील तसं)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) प्रदीप मुळे (नाटक-व्हॅक्युम क्लीनर)

संगीत दिग्दर्शन:

प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) अशोक पत्की (नाटक- हरवलेल्या पत्त्यांचा बंगला)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) शैलेश बर्वे (नाटक- सर, प्रेमाचं काय करायचं)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) मनोहर गोलांबरे (नाटक-दर्याभवानी)

वेशभूषा:

प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) अमीता खोपकर (नाटक- आमने सामने)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव (नाटक-हरवलेल्या पत्त्यांचा बंगला)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) कलीका विचारे (नाटक- दर्याभवानी)

रंगभूषा:

प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) उल्लेश खंदारे (नाटक- व्हॅक्युम क्लीनर)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) उदयराज तांगडी (नाटक- दर्याभवानी)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) उल्लेश खंदारे (नाटक- हरवलेल्या पत्त्यांचा बंगला)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.50,000/-

पुरुष कलाकार: रोहन गुजर (नाटक-आमने सामने), मंगेश कदम (नाटक-आमने सामने), विशाल तांबे (नाटक-प्रेम करावं पण जपून), मकरंद देशपांडे (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं), निनाद लिमये (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं)

स्त्री कलाकार: वंदना गुप्ते (नाटक-हरवलेल्या पत्त्यांचा बंगला), दिप्ती लेले (नाटक-हरवलेल्या पंत्याचा बंगला), लिना भागवत (नाटक-आमने सामने), निर्मिती सावंत (नाटक-व्हॅक्युम क्लीनर‍), आकांक्षा गाडे (नाटक-सर, प्रेमाचं काय करायचं)

दि. 26 फेब्रुवारी ते 07 मार्च 2024 या कालावधीत श्री शिवाजी मंदिर, दादर, मुंबई याठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 07 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवदास घोडके, रवींद्र आवटी, विजय कदम, प्रदीप कबरे व मुग्धा गोडबोले यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या...

‘मेट गाला’मध्ये झाली सर्वात वाईट पोशाखाचीच चर्चा!

एआय वधू येत आहे का? असा प्रश्न पडावा. कॅटी पेरीने आपला चेहरा रोबोटसारख्या दिसणाऱ्या चंदेरी मास्कने पूर्णपणे झाकला होता आणि त्यावर तिने खांद्याविना, मोठा चौकोनी गळा असलेला पांढरा रेशमी गाऊन परिधान केला होता. पांढऱ्या सॅटिन ऑपेरा ग्लोव्हज घालून तिने...

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचा पीए गोळीबारात ठार! कारचालकही जखमी!!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात बुधवारी रात्री उशिरा ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघात पराभूत करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला....
Skip to content