Homeन्यूज अँड व्ह्यूजसीमा रस्ते प्रकल्पांवरील...

सीमा रस्ते प्रकल्पांवरील अस्थायी कामगारांसाठी 10 लाखांची समूह विमा योजना!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटना / जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सने सध्या सुरू असलेल्या कामांवर नियुक्त केलेल्या अस्थायी कामगारांसाठी (CPLs) समूह (मुदत) विमा योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत कामगाराचा विमा म्हणून हमी असलेली 10 लाख रुपयांची रक्कम, अस्थायी कामगाराचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला / वारसाला दिली जाईल.

धोकादायक प्रकल्पस्थळ, विपरित हवामान, दुर्गम भाग आणि व्यवसायसंबंधित आरोग्यविषयक जोखमी आणि त्यांच्या कामादरम्यान होणारे / नोंद होणारे मृत्यू विचारात घेऊन या सीपीएलसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून देण्यात येणाऱ्या विमा छत्रामुळे त्यांचे मनोधैर्य मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. देशाच्या दुर्गम आणि अतिदूरवर असलेल्या भागांमध्ये काम करणाऱ्या सीपीएलसाठी ही योजना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपाययोजना म्हणून काम करेल. त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी ही योजना दीर्घ काळ उपयुक्त ठरेल. अलीकडेच संरक्षणमंत्र्यांनी सीपीएलच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी दिली होती, ही बाब विचारात घेतली पाहिजे. यामध्ये खालील उपाययोजनांचा समावेश होता.

  • अटेंडंटच्या पार्थिवाचे जतन आणि वाहतुकीचा आणि प्रवासाचा भत्ता.
  • अंत्यसंस्कारासाठी मदतीच्या रकमेत रु.1000 वरून रु. 10,000 इतकी वाढ.
  • मृत्यू झाल्यास तातडीची मदत म्हणून रु. 50,000 इतकी सानुग्रह भरपाई.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content