दिवाळीचा मुहूर्त साधून दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आनंद राठी आणि एसबीआय सिक्युरिटीज, या आघाडीच्या गुंतवणूक संस्थांनी शिफारस केलेले 10 स्टॉक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे शेअर्स तुम्हाला वर्षभरात 30% म्हणजे एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 30 हजार रुपये रिटर्न्स (परतावा) देऊ शकतात. बँक एफडी, पोस्टाची आरडी किंवा इतर नेहमीच्या गुंतवणुकीपेक्षा या शेअर्समधून तुम्हाला तब्बल तिप्पट रिटर्न्स जास्त मिळू शकतात.
आनंद राठी ही एक देशातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी आहे, जी संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक सल्लागार आणि ब्रोकिंगसह विविध सेवा प्रदान करते. त्याचप्रमाणे, एसबीआय सिक्युरिटीज ही भारतीय ब्रोकिंग उद्योगातील एक प्रमुख संस्था आहे. विश्वासार्ह गुंतवणूक सल्लागार सेवा देण्यासाठी या दोन्ही संस्था ओळखल्या जातात. दोन्ही संस्थांनी अलीकडेच मजबूत वाढीची क्षमता असलेले स्टॉक निवडून त्यांना “बाय” रेटिंग दिले आहे. या स्टॉकबाबत आपण अवघड तांत्रिक परिभाषा टाळून थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊ.
“आनंद राठी”ने सुचविलेले शेअर्स
1. शक्ती पंप्स लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 803.75
संभाव्य टार्गेट: ₹ 1,050
रिटर्न्स: 30%
* पंप-पंपिंग सिस्टीमच्या निर्मिती आणि पुरवठ्यामध्ये विशेषज्ञ असलेली तसेच जल व्यवस्थापन उपायांवर लक्ष केंद्रित करणारी ही एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन व सेवांमध्ये सबमर्सिबल पंप, सौर पंप आणि इतर ऊर्जा-कार्यक्षम पंपिंग उपायांचा समावेश आहे. भारतीय सौर पंप बाजारपेठ 11% वार्षिक दराने वाढत असल्याचा कंपनीला फायदा होणार आहे.

2. तिलकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 476.60
संभाव्य टार्गेट: ₹ 580
रिटर्न्स: 28%
अल्कोहोलिक पेयांचे उत्पादन, मार्केटिंग करणारी ही एक प्रमुख भारतीय कंपनी आहे. लोकप्रिय ब्रँड रामपूर इंडियन सिंगल माल्ट व्हिस्कीसह इतर रम, ब्रँडी व विविध स्पिरिट्ससाठी कंपनी ओळखली जाते. कंपनीने नुकतेच मोनार्क लेगसी आणि मॅन्शन हाऊस व्हिस्कीसारख्या प्रीमियम उत्पादनांचे लाँचिंग केले आहे. यामुळे कंपनी पोर्टफोलिओला बळकटी मिळेल. आता आर्थिक वर्ष 2026पर्यंत नफ्याच्या मार्जिनमध्ये 15%-16.5%चे सुधारित उद्दिष्ट आहे.
3. ब्लॅकबक लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 691.15
संभाव्य टार्गेट: ₹ 860
रिटर्न्स: 26%
देशभरात मालवाहतूक सोल्यूशन पुरविणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित ही भारतातील प्रमुख लॉजिस्टिक्स कंपनी आहे. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ट्रकर्स आणि फ्लीट मालकांना एकत्रित जोडून रिअल-टाइम ट्रॅकिंग, ऑप्टिमायझेशन आणि कार्गो वाहतुकीसाठी सुलभ बुकिंगसारख्या सेवा पुरविल्या जातात. पूर्वीच्या झिंका लॉजिस्टिक्सचे शेअर्स ब्लॅकबकमध्ये एकत्रित होऊन “लोड्स मार्केटप्लेस”मुळे अतिरिक्त नफा येईल. पेमेंट, टेलिमॅटिक्स आणि लॉजिस्टिक्स सेवांमध्ये मजबूत डिजिटायझ्ड ट्रकिंग इकोसिस्टममध्ये कंपनीने आघाडी घेतली आहे.

4. फिएम इंडस्ट्रीज लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 1,975.50
संभाव्य टार्गेट: ₹ 2,450
रिटर्न्स: 26%
ऑटोमोटिव्ह लाइटिंग आणि सिग्नलिंग उपकरण क्षेत्रातील ही कंपनी प्रामुख्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विभागांना सेवा देते. कंपनी हेडलाइट्स, टेललाइट्स, रिफ्लेक्टर्स आणि इंडिकेटरसह विविध प्रकारचे उत्पादन करते. एलईडीकडे केलेल्या धोरणात्मक बदलाचा कंपनीला मोठा फायदा होईल, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाटा 64%वरून 75% ते 80%पर्यंत वाढेल. प्रवासी वाहनांमध्ये विस्तार योजना आणि 200 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या उपक्रमासह, कंपनी जीएसटी सुधारणांचा फायदा घेण्यासाठी, ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.
5. बीएसई लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 2,456.30
संभाव्य टार्गेट: ₹ 2,800
रिटर्न्स: 18%
इक्विटीज, डेरिव्हेटिव्ह्ज आणि म्युच्युअल फंड्ससारख्या विविध वित्तीय साधनांमध्ये व्यापारासाठी प्रमुख व्यासपीठ असलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या स्टॉक एक्सचेंजपैकी एक आहे. बीएसई भारतातील वित्तीय बाजाराच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लिस्टिंग, ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंटसारख्या सेवा प्रदान करते. आयपीओची चांगली गती आणि डेरिव्हेटिव्ह्ज विभागात वाढ होत आहे. विक्रमी एसआयपी गुंतवणूक प्रवाहामुळे भांडवल बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचे दिसून येते.

6. अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 4,259.60
संभाव्य टार्गेट: ₹ 5,000
रिटर्न्स: 16%
डी-मार्टची मूळ कंपनी असलेली अव्हेन्यू सुपरमार्ट्स ही भारतातील आघाडीच्या सुपरमार्केट साखळींपैकी एक आहे. स्पर्धात्मक किंमतीत किराणा, घरगुती वस्तू, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्ससह विविध उत्पादनांची विस्तृत श्रेणी या हायपरमार्केटमध्ये उपलब्ध आहे. स्टोअर विस्ताराच्या गतीत लक्षणीय वाढ, सामान्य वस्तू आणि कपड्यांमधून अपेक्षेपेक्षा जास्त महसूल योगदान, मार्जिन डिलिव्हरी आणि ऑनलाईन डी-मार्ट रेडी उपक्रमातून अपेक्षेपेक्षा चांगले महसूल/नफा मिळू लागला आहे.
“एसबीआय सिक्युरिटीज”ने सुचविलेले शेअर्स
1. ओसवाल पंप्स लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 737.35
संभाव्य टार्गेट: ₹ 970
रिटर्न्स: 25%
शेती, बांधकाम आणि औद्योगिक अनुप्रयोगांसह विविध क्षेत्रांना उच्च दर्जाचे पंप आणि पंपिंग सोल्यूशन्स सेवा पुरविणारी ही आघाडीची उत्पादक कंपनी आहे. सेंट्रीफ्यूगल पंप, सबमर्सिबल पंप आणि घरगुती पंपांसह विश्वसनीय आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादनांसाठी कंपनी ओळखली जाते. चांगला मान्सून, नवी जीएसटी संरचना यामुळे वाढीव मागणीचा फायदा कंपनीला होईल.

2. स्वराज इंजिन्स लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 4,337.20
संभाव्य टार्गेट: ₹ 5,112
रिटर्न्स: 24%
प्रसिद्ध स्वराज ट्रॅक्टर ब्रँडची प्रमुख पुरवठादार असलेली, कृषी आणि औद्योगिक वापरासाठी, विशेषतः ट्रॅक्टरसाठी इंजिनांची निर्मिती करणारी ही एक प्रमुख कंपनी आहे. कंपनी सातत्याने ग्रामीण आणि शेती क्षेत्रांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली उच्च-कार्यक्षमता इंजिन तयार करते. जीएसटी सुधारणांचा कंपनीला मोठा फायदा होणार आहे.
3. अशोक लेलँड लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 135.69
संभाव्य टार्गेट: ₹ 170
रिटर्न्स: 23%
ट्रक, बस आणि संरक्षण वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखली जाणारी ही एक आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. सात दशकांहून अधिक काळ उद्योग अनुभव असलेली ही कंपनी नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये हेवी-ड्युटी ट्रक आणि पर्यावरणपूरक वाहनांचा समावेश आहे. वाढते संरक्षण बजेट, नव्या जीएसटीमुळे किंमती स्वस्त झाल्याचा फायदा कंपनीला होईल.

4. पॉन्डी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड
सध्याची किंमत: ₹ 1,371.90
संभाव्य टार्गेट: ₹ 1,530
रिटर्न्स: 23%
नॉन-फेरस धातूंच्या पुनर्वापरातील ही आघाडीची कंपनी आहे. शिशाचा पुनर्वापर, मिश्रधातू आणि शिशाच्या ऑक्साइडच्या उत्पादनात कंपनी विशेषज्ञ आहे. ऑटोमोटिव्ह, बॅटरी उत्पादन आणि सौरऊर्जेसह विविध क्षेत्रांना कंपनी सेवा देते. या क्षेत्रातील वाढत्या मागणीचा कंपनीला फायदा होणार आहे.
सर्व शेअर्सच्या सध्याच्या किंमती (CMP) या 15 ऑक्टोबरचे क्लोजिंग प्राईज आहेत.
डिस्क्लेमर:
किरण हेगडे लाईव्ह (KHL)वर दिले जाणारे गुंतवणूक सल्ले हे त्या क्षेत्रातील तज्ञ/ब्रोकिंग हाऊसेस/रेटिंग एजन्सींच्या रिपोर्ट्स आधारे दिले जातात. हे त्या तज्ञ आणि मार्केट संस्थांचे संशोधन अन् अंदाज यावर आधारित गुंतवणूक टिप्स आहेत. KHL किंवा तिच्या व्यवस्थापनाचे हे अंदाज नाहीत. आम्ही फक्त सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. इक्विटीमध्ये गुंतवणुकीत आर्थिक जोखीम असते, म्हणून गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना किंवा ट्रेडिंग करताना योग्य ती काळजी घ्यावी. या बातमीच्या आधारे केलेल्या व्यवहारातून झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी KHL किंवा लेखक जबाबदार नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.
