Homeन्यूज ॲट अ ग्लांसप्रतिभाआजी धावल्या नातू...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत.

आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी घरोघर फिरून प्रचार केला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रतिभा पवार यांनी पहिल्यांदाच प्रचार केला होता. राष्ट्रवादी शपच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्या बाहेर पडल्या होत्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवतीनेही प्रचारात भाग घेतला होता. तेव्हा सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत.

प्रतिभा

आदित्य ठाकरेंची माहीम, जोगेश्वरीतल्या सभा रद्द

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या टिकेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या माहीम विधानसभा मतदारसंघातली आपली आज होणारी जाहीर सभा रद्द केली आहे. या मतदारसंघातून मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात आपणच त्यांना नेण्यासाठी कार घेऊन गेलो होतो. आदित्य ठाकरे मागच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक आखाड्यात उतरले तेव्हा आपणच त्यांच्याविरोधात वरळीत उमेदवार दिला नाही. घरातल्या गोष्टींत मी राजकारण आणत नाही, असे राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत सांगितले होते.

दोन दिवसांपूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार नव्हते. आम्हाला त्याची गरज वाटत नाही. माहीम आमचेच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांनी वरळीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचाराकरीता जाहीर सभा घेतली आणि लगेचच माहीममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र, आज दुपारनंतर ही सभा रद्द करण्यात आली.

आज आदित्य ठाकरे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार होते. ती सभाही त्यांनी ऐनवेळी रद्द केली आहे. बाळा नर, येथून एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीत असलेले खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. वायकर आणि उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी तेथील सभा रद्द केली असावी, असे जाणकारांना वाटते.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content