Homeचिट चॅटविनामूल्य प्रशिक्षण घ्या...

विनामूल्य प्रशिक्षण घ्या श्री गणेश पूजनाचे

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग येत्या १२ मे २०२४ पासून, दरवर्षीप्रमाणे, दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मुंबईतल्या दादरच्या छबिलदास रोडवरील वनमाळी हॉल येथे होतील. सदर वर्ग नि:शुल्क आहेत.

सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग आणि वयाच्या व्यक्तींना येथे मुक्त प्रवेश आहे. प्रत्येकास १२ मेपासून श्रावण महिना संपेपर्यंत दर रविवारी हजर राहयचे आहे. नोंदणी आवश्यक नाही. इच्छुकांनी थेट वनमाळी हॉल येथे वही आणि पेन घेऊन हजर राहवे. अधिक माहितीसाठी प्रमोद नाईक ९९२००६६५७५ यांच्याशी संपर्क साधावा.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content