Homeन्यूज अँड व्ह्यूज'गायतोंडे'ने एक सामान्य...

‘गायतोंडे’ने एक सामान्य माणूस ४ दिवस अस्वस्थ..

सतीश नाईक ‘लोकप्रभा’त पत्रकारिता करत असल्यापासून मी त्याला ओळखत आहे. कारण ‘लोकप्रभा’ हे लोकसत्तेचं भावंडं होतं. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की सतीश अगदी झोकून देऊन ती गोष्ट तडीस नेतो, हे अनुभवाने माहित होतंच. चित्रकार गायतोंडे, या मराठी पुस्तकाने ते प्रकर्षाने जाणवलेही होते. २०१६मध्ये गायतोंडे मराठीत प्रकाशित झाल्यापासून जवळजवळ नऊ वर्षांनी आज ‘गायतोंडे : बिटवीन टू मिरर्स’ हा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाक्षेत्राचा मुकूटमणी असलेल्या छत्रपती शिवाजी वस्तूसंग्रहलयाच्या भव्य पटागणांत हा प्रकाशन सोहळा होत असून पद्मभूषण डॉ. नंदू लाड व प्रख्यात अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. प्रयाग शुक्ला, प्रख्यात पत्रकार पद्मश्री कुमार केतकर, शरयू दोषी, डॉ. फिरोजा गोदरेज व ग्रंथाच्या अनुवादिका शांता गोखले याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

गायतोंडे यांचे कलाक्षेत्रातील असाधारण योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन, इतकेच नव्हे तर झपाटून जाऊन सतीश नाईक यांनी गायतोंडे, या मराठी ग्रंथाचे प्रकाशन केले होते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. तसेच काहीसे झपाटून त्यांनी याही ग्रंथासंबंधी कामकाज केलेले आहे. मराठी ग्रंथ वाचल्यावर शांता गोखले यांनीही क्षणाचाही विलंब न लावता अनुवादाची जबाबदारी स्वीकारली व सांगितलेल्या वेळेआधीच ती पूर्णही केली हे विशेष!

चार दिवस झोपलो नाही. अस्वस्थ होतो. गायतोंडे यांचे चरित्र मराठीत प्रसिद्ध झाल्यावर ज्या व्यक्तीचा कलाक्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा व्यक्तीने मी तीन-चार दिवस हे चरित्र वाचत होतो व कमालीचा अस्वस्थ झालो होतो असे मला फोन करून सांगितल्याचे नमूद करून नाईक म्हणाले की, नरेंद्र डेंगळे या गायतोंडे यांच्या संपर्कातील कलाकार मित्राने काही गोष्टी सांगितल्यानंतर मी पूरता झपाटून गेलो होतो. डेंगळे म्हणतात की, ठेंगणीशी मूर्ती, लहानसे हाताचे तळवे, छोटीशी बोटे, सर्वच आर्टिस्टच्या रूढ प्रतिमेविरुद्ध होतं. बुद्धाची असीम शांतता लाभली तर माझं रंगचित्रण आपोआप थांबेल. चित्रकलेतून काही मिळवायचं आहे या तरुणपणाच्या इच्छेतून मी केव्हाच निवृत्त झालेलो आहे, असेही विचार गायतोंडे यांनी व्यक्त केल्याचे डेंगळे यांनी नमूद केले. मी संदेश देत नाही, असा हा कलंदर कलाकार म्हणतो. मी माझ्या कलेची सुरुवात इतरांसारखीच मानवी आकृती असलेल्या चित्रांनी केली.. मग काही काळ मी माझी स्वत:ची अभिव्यक्तीची शैली स्वतःच नैसर्गिकरित्या वाढवली आणि हळूहळू माझ्या चित्रातल्या मानवी आकृती गाळत गेलो. माझा काहीही संदेश नाही. मी राजकीय, सामाजिक, तत्त्वज्ञाननिष्ठ, नैतिक वा अध्यात्मिकरित्या काहीही विधान करत नाही. मी चित्र रंगवतो. कारण चित्र रंगवणे मला आनंद देते, असे रोखठोक विधान करण्यासही तो कचरत नाही हे विशेष.
मणिकांचन योगच!!

विशेष म्हणजे गायतोंडे या इंग्रजी चरित्रग्रंथाचे मराठी भाषा दिनी प्रकाशन होत आहे. एक मराठी कलंदर कलाकार चरित्र रूपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर जात आहे आणि त्याचे श्रेय सतीश नाईक, शांता गोखले व चिन्ह परिवाराला जाते हे मान्यच केले पाहिजे.

छायाचित्रः नील दफ्तरदार

Continue reading

गुजरात विकासाचे असेही ‘विकसित वास्तव (मॉडेल)’!

मुंबईसारखीच परिस्थिती ठाणे शहर व आसपासच्या परिसराची झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये! ती परिस्थिती म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी! हल्लीच्या भाषेत परप्रांतीय व स्थलांतरित या शब्दांना 'ग्लोबल' वेष्टन लावून विकण्याची पद्धत आहे. पण जे हे ग्लोबल लेबल...

उपायुक्त पाटोळेवरच्या धाडीनंतर झाली ‘मांडवली’?

दसऱ्याच्या आदल्यादिवशी जोरशोरसे सांगून ५० लाख रुपयांच्या लाचेच्या आरोपाखाली ठाण्याचे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना केलेली अटक वा कारवाई ही एक 'फार्स' ठरणार असल्याची माहिती काल सुमारे दोन-अडीच तास ठाणे महापालिका मुख्यालयात फेरफटका मारला असता हाती आली. तक्रारदार मुलुंड...

शुभेच्छांच्या बॅनर्सनी यंदा नवरात्रीत देवी गुदमरली!

गेल्या काही वर्षांपासुन एक लक्षात आले आहे की, सणासुदीचा मोसम सुरु झाला की झाडून सर्व कपंन्या किंमतीत भरीव सूट देणाऱ्या सेलची जाहिरात करत असतात. मग या सेलमध्ये अगदी झाडू, चप्पलपासून उंची साड्या, ड्रेसेसपर्यंत काहीही मिळते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तर हल्ली...
Skip to content