Homeचिट चॅटआशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये गायत्री...

आशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये गायत्री बडेकरची सुवर्णमय कामगिरी

उत्तराखंडच्या डेहराडून येथे नुकत्याच झालेल्या आशियाई सबज्युनिअर, ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सब ज्युनिअर महिलांच्या गटात आय .एन.डी. वेटलिफ्टिंग – पॉवरलिफ्टिंग क्लब, कर्जतची खेळाडू गायत्री आशा महेश बडेकर हिने ४३ किलो वजनी गटात शानदार सुवर्णमय कामगिरी केली. स्कॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात तिने जुने आशियाई विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावे केले. तसेच तिन्ही प्रकारात ३२५ किलो सर्वाधिक वजन उचलून नवीन विक्रम नोंदवला.

सध्याची आशिया खंडातली तसेच भारतातील एकमेव पॉवरलिफ्टर जिने स्कॉट, बेंच आणि डेडलिफ्ट आणि एकूण असे एकाचवेळी चारही प्रकारात नवे विक्रम केले. कर्जत येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या गायत्रीला राष्ट्रीय कुस्ती वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळाडू हनुमंत खरात (वन विभाग, महाराष्ट्र शासन) यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले.
तसेच सरावासाठी अंजली येवले आणि प्रथमेश भालेकर यांचे सहकार्य मिळाले. ऑर्किड कॉलेज कशेळे, कर्जतची विद्यार्थिनी असलेल्या या मुलीने पहिल्याच प्रयत्नात सबज्युनिअर स्पर्धेत भारतीय संघातर्फे भाग घेऊन ४ सुवर्णपदके प्राप्त केली. याअगोदर रायगडच्या सलोनी मोरे ,अमृता भगत यांनी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय सरदेसाई, पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायत्रीचे गायत्रीचे अभिनंदन केले आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content