Homeएनसर्कलगडचिरोलीचे डॉ. कोडवते...

गडचिरोलीचे डॉ. कोडवते दांपत्य भाजपात

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉ.चंदा कोडवते या दांपत्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा.अशोक नेते, आ. बंटी भांगडिया, बाबुराव घोडे, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. कोडवते पती-पत्नीच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटना वाढीसाठी मदत होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

कोडवते

याप्रसंगी बावनकुळे म्हणाले की, डॉ. कोडवते यांनी कोरोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची निरपेक्ष सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी डॉ. कोडवते दाम्पत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटूंब या नात्याने पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील. डॉ. कोडवते दांपत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाच्या होत असलेल्या विकासाने प्रेरित होऊन भाजपामध्ये आलेल्या कोडवते पती- पत्नीच्या नेतृत्वाला योग्य संधी, सन्मान दिला जाईल.

मोदी सरकारच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्याचा विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. यापुढे भाजपासाठी निरपेक्ष भावनेने काम करू असे डॉ. नितीन व डॉ. चंदा यांनी यावेळी सांगितले. डॉ.चंदा यांनी 2019मध्ये गडचिरोली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवत 70 हजार मते मिळवली होती.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content