Homeचिट चॅटदिव्यांग बालकांना मिरजच्या...

दिव्यांग बालकांना मिरजच्या शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असून मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, मिरज यांनी केले आहे.

मोफत शिक्षण सुविधेमध्ये संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण, इयत्ता 5वीपासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, माध्यमिक शाळेत जाण्यायेण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आहेत. वसतिगृह सुविधेमध्ये दिव्यांग मुला-मुलींची स्वतंत्र निवासव्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधेमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप, वयोगट शून्य ते सहाकरिता मोफत भौतिकोपचार करण्यात येतील.

प्रवेशाबाबतच्या अटींनुसार प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17 वर्षे, प्रवेशअर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या दिव्यांगाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तीन फोटो आवश्यक आहेत. प्रवेशअर्ज व माहितीपत्रक पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी मिरज – 416410, जि. सांगली या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9325555981, 9552234586, 9422216459 यावर संपर्क साधता येणार आहेत.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content