Homeचिट चॅटपुराणिक क्रिकेटः सुपर...

पुराणिक क्रिकेटः सुपर ओव्हरमध्ये फोर्ट यंगस्टर्सची राजावाडी क्लबवर मात

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत जान्हवी काटे व मानसी पाटील यांच्या अष्टपैलू खेळामुळे फोर्ट यंगस्टर्स संघाने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबवर मात केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाजी पार्क येथील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा ७ विकेटने पराभव केला. विजयी संघाच्या अष्टपैलू खेळाडू पूनम राऊत व मध्यमगती गोलंदाज जाई गवाणकर चमकल्या. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जान्हवी काटे व जाई गवाणकर यांनी पटकाविला.

राजावाडी क्लबने नाणेफेक जिंकून फोर्ट यंगस्टर्सला प्रथम फलंदाजी दिली. सलामी फलंदाज जान्हवी काटे (५६ चेंडूत ८६ धावा) व मानसी पाटील (३१ चेंडूत ३४ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केल्यामुळे फोर्ट यंगस्टर्सने मर्यादित २० षटकात ४ बाद १६३ धावांचा पल्ला गाठला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी फलंदाज अचल वळंजूने (३३ चेंडूत ४१ धावा) एक बाजू नेटाने लढवूनही १२व्या षटकाला राजावाडी क्लबचा निम्मा संघ ७८ धावांत तंबूत परतला. अशी करामत मानसी पाटील (२९ धावांत ३ बळी) व हिमजा पाटील (२१ धावांत २ बळी) यांच्या फिरकी गोलंदाजीने केली. तरीही क्षमा पाटेकर (३१ चेंडूत नाबाद ६० धावा) व निविया आंब्रे (२७ चेंडूत नाबाद ३३ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी ४८ चेंडूत ८५ धावांची अभेद्य भागीदारी करून प्रतिस्पर्ध्यांच्या १६३ धावसंख्येशी बरोबरी केली. परिणामी सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला. मानसी पाटीलच्या ऑफब्रेक गोलंदाजीपुढे राजावाडी क्लबला ६ चेंडूत केवळ ८ धावाच काढता आल्या. जान्हवी काटेच्या (३ चेंडूत नाबाद ९ धावा) खणखणीत दोन चौकारामुळे ४ चेंडूत बिनबाद १० धावा फटकाविल्यामुळे फोर्ट यंगस्टर्सचा विजय सुकर झाला.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या डावाची सुरुवात जाई गवाणकर (२६ धावांत ४ बळी) व सिध्दी पवार (५ धावांत २ बळी) यांच्या अचूक मध्यमगती माऱ्यामुळे डळमळीत झाली. किंजल कुमारीने (४२ चेंडूत ४३ धावा) दमदार फलंदाजी करूनही साईनाथ क्लबला २० षटकात ८ बाद ११४ धावांपर्यंतच मजल मारता आली. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने १४ व्या षटकाला ३ बाद ११७ धावा नोंदवून विजयी लक्ष्य सहज गाठले.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content