Homeब्लॅक अँड व्हाईटकाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष...

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील भुईंज गावी वद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास सातारा जिल्ह्यातील भुईंज गावच्या सरपंचपदापासून सुरु झाला. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी चार वेळा विजय संपादन करुन राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केले. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातून १९८४, १९८९ आणि १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन ते लोकसभेत गेले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले.

१९९७ साली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देत राज्यात सत्ता आणली. प्रतापराव भोसले यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. संधीचे सोने करत त्या पदाला न्याय देण्याचे काम केले.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर कृषी, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केले. शासनाच्या विविध योजना सातारा जिल्ह्यात राबवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Continue reading

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

राज्यातील साखर आयुक्तपदातील सावळागोंधळ सुरूच आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांचीही सहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. काल उशिरा जारी आदेशानुसार, त्यांची मुंबईत कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी राज्याचा ऊसगाळप हंगाम सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये...

शनिवारपासून मुंबईतली मोनोरेल तात्पुरती बंद!

मुंबई मोनोरेल भविष्यासाठी अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या 20 सप्टेंबर 2025पासून मोनोरेलची सेवा काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात, नवीन "रोलिंग स्टॉक" (रॅक), प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे बुकिंगसाठी पहिल्या 15 मिनिटांत आधार अनिवार्य

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम...
Skip to content