Homeचिट चॅटटिळकांच्या स्वराज्यभूमीवर झाले...

टिळकांच्या स्वराज्यभूमीवर झाले अमृतमहोत्सवी ध्वजारोहण

मुंबईतल्या गिरगाव चौपाटी येथील स्वराज्यभूमी, या लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानासमोर दैवज्ञ समाजाचे समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवपूर्ती ध्वजारोहण काल करण्यात आले.

महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाने यावेळी राष्ट्रगीत गाऊन शानदार सलामी दिली. ब्रिटिशांनी त्यावेळच्या लोकमान्य टिळक स्मारक समितीला अमर्याद लीजवर दिलेल्या जागेत ‘मेरी माटी मेरा देश’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोकमान्य टिळकांची पणती उज्ज्वला मेहेंदळे यांनी वृक्षारोपण केले. या जागेत असलेल्या उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या नियमावलीमुळे राष्ट्रपुरुषांच्या या आंतर्राष्ट्रीय दर्जाच्या स्मारक निर्मितीत अडचण येत आहे. येथे भूमिगत चित्रशिल्प व भव्य कृतज्ञता ध्वजस्तंभ उभारण्याचा स्वराज्यभूमी स्मारक समितीचा संकल्प आहे. ती योजना २०२०पासून शासनाकडे प्रलंबित आहे.

उच्चाधिकार समितीच्या नियमांचे पालन करीत लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती समारंभाचे आयोजन करीत असते. समारंभाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिका ड विभाग सांभाळत असते. राष्ट्रपुरुषांच्या समाधीस्थान परिसराची सुरक्षाव्यवस्था भडकमकर मार्ग पोलीसठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content