Wednesday, February 5, 2025
Homeचिट चॅटराजभवनात ५ राज्यांसह...

राजभवनात ५ राज्यांसह ५ केंद्रशासित प्रदेशांचा स्थापनादिन उत्साहात साजरा!

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या पाच राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमा अंतर्गत विविध राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार अनू मलिक, राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच निमंत्रित उपस्थित होते.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमामुळे विविध राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंस्कृती, लोक संगीत व लोककला याबाबत माहिती मिळते. देशातील सर्व राजभवनांमध्ये इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला पुष्टी मिळत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

आदि शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन करुन देशाला सांस्कृतिक एकात्मतेने जोडले, असे नमूद करून आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश एकात्म भावनेने जोडला गेला आहे, याचे श्रेय आदि शंकराचार्य यांच्या द्रष्टेपणाला जाते, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कमी वेळात विविध राज्यांची लोकगीते व नृत्ये शिकून राजभवन येथे सादर केल्याबद्दल राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्रे देऊन गौरवीत केले.

श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांच्या विद्यार्थिनींनी हरियाणा, पंजाब (गिद्धा लोकनृत्य ), केरळ (मोहिनीअट्टम), तामिळनाडू (कारगट्टम) व कर्नाटक येथील लोकनृत्य सादर केले; तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी भांगडा, कोलकली नृत्य (लक्षद्वीप) व पुडुचेरीचे गरादी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content