Homeमुंबई स्पेशलश्री महालक्ष्मी मंदिराजवळ...

श्री महालक्ष्मी मंदिराजवळ साकारले पहिले रोबोटिक वाहनतळ!

मुंबईतल्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराजवळच्या एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका भव्य पोलादी ‘प्लेट’वर एक कार उभी केली जाते. पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने कारची नोंद केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते, ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर तब्बल २१ मजली वाहनतळामध्ये असणाऱ्या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते.

२१ मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन कार पार्क केली जाते. याचप्रकारे पार्किंगमधून कार बाहेर काढतानादेखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच कार  बाहेर पडते.

हे एखाद्या विदेशी चित्रपटातील दृश्याचे वर्णन नसून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे वास्तव आहे. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित व नूतनीकरण करण्यात आलेल्या या स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळाचे लोकार्पण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांची विशेष उपस्थिती यावेळी होती. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल हा कार्यक्रम झाला.

या नूतनीकृत वाहनतळ लोकार्पण कार्यक्रमाला स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या स्वयंचलित वाहनतळाची वैशिष्ट्ये अशीः

१. मुंबई महापालिकेच्या ‘डी’ विभागात भुलाभाई देसाई मार्गालगत व सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराजवळ असणाऱ्या हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित हे स्वयंचलित वाहनतळ आहे.

२. या २१ मजली (Ground + 20) वाहनतळामध्ये साधारणपणे २४० वाहने उभी करता येतील, एवढी जागा उपलब्ध आहे.

३. या वाहनतळाला २ प्रवेशद्वारे असून २ बहिर्गमन द्वारे आहेत. या वाहनतळाची स्वयंचलित प्रचालनक्षमता दर तासाला ६० वाहनइतकी आहे.

४. हे वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास कार्यरत राहणार आहे.

५. हे वाहनतळ उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामुग्रीपैकी ८० टक्के सामुग्री भारतीय असून २० टक्के सामुग्री आयात केलेली आहे.

६. या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरीता २ मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त २ शटल डिव्हाइस व २ सिलोमेट डॉली आहेत. कार वळविण्यासाठी ४ स्वयंचलित टर्न टेबलदेखील या वाहनतळामध्ये आहेत.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content