Friday, May 9, 2025
Homeकल्चर +महिला सामर्थ्य दाखवणारा...

महिला सामर्थ्य दाखवणारा ‘फाईट लाइक अ गर्ल’!

मॅथ्यू ल्युटवायलर दिग्दर्शित ‘फाईट लाइक अ गर्ल’, हा चित्रपट तरुण काँगोली महिलेची कथा सांगतो. या तरुणीला अवैध खनिज खाणीतून स्वतःची सुटका केल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये नवे जीवन मिळते. हा चित्रपट गोवा येथे आयोजित 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणीअंतर्गत प्रदर्शित करण्यात आला.

माध्यमांशी संवाद साधताना चित्रपटाचे मॅथ्यू ल्युटवायलर म्हणाले की, हा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित आहे. हा चित्रपट पूर्व काँगोमधील महिला बॉक्सिंग क्लबच्या कथेवर आधारित आहे. या क्लबची सुरुवात एका सैनिकाने केली होती. लैंगिक हिंसाचार आणि विश्वासघाताला बळी पडलेल्या तरुणींनी त्याच्याशी संपर्क साधला. बॉक्सिंगच्या माध्यमातून या तरुणींना त्यांचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी तो त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी एक तरुणी आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या उद्देशाने बॉक्सिंग क्लबमध्ये आली. पण नंतर तिच्या सूडाचे रूपांतर होत ती बॉक्सिंगला एक खेळ म्हणून स्वीकारते. या महिलेच्या जीवन प्रवासामुळेच मला त्यातून चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली.

या चित्रपटाचा एक अनोखा पैलू म्हणजे 80% कलाकार हे मूळतः कलाकार नाहीत. चित्रपटात दाखवलेले क्लबचे बहुतेक बॉक्सर काँगोच्या अंतर्गत भागांतील खरे बॉक्सर आहेत, असे त्यांनी सांगितले.

नायिकेच्या भूमिकेसाठी केलेल्या तयारीबद्दल तपशीलवार सांगताना मुख्य अभिनेत्री अमा कमता म्हणाली की, वास्तविक जीवनात कधीही लढा न देणारी व्यक्ती म्हणून बॉक्सरच्या भूमिकेत उतरणे हे एक मोठे आव्हान होते. तयारीचा एक भाग म्हणून, मी आठवड्यातून सहा दिवस सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास प्रशिक्षण घ्यायचे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा केवळ बॉक्सरची नाही. यात अत्याचाराविरुद्ध लढा, व्यवस्थेविरुद्ध लढा आणि जीवनासाठी लढा देण्याची प्रेरणा आहे.

सारांश: बेकायदेशीर खनिज खाणीत काम करण्यास भाग पाडलेली एक तरुण काँगोली स्त्री, तिच्या अपहरणकर्त्यांपासून स्वतःची सुटका करते. सीमावर्ती शहर गोमा येथील एका प्रसिद्ध अखिल-महिला बॉक्सिंग क्लबमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला स्वतःचे एक नवे जीवन मिळाले. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

Continue reading

उत्तरा केळकर यांना अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. उद्या, शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री...

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’ प्रेक्षकांसमोर!

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील "आभाळ रातीला" या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट "सजना" या चित्रपटातील नवीन गाणं "आभाळ रातीला" प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम...

मुंबई महापालिकेकडून आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठाही संकलित

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि इतर विशेष कचऱ्याच्या संकलनाची सेवा सुरू करण्यात आली...
error: Content is protected !!
Skip to content