मुंबईच्या बा. य. ल. नायर रुग्णालयातल्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झालेल्या नोंदणी सहाय्यक कांचन उल्लालकर यांना रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नुकताच निरोप देण्यात आला.
अधिष्ठाता डॉ. मेढेकर यांच्यासोबत उल्लालकर यांना शुभेच्छा देताना उपअधिष्ठाता डॉ. मनिषा मेस्त्री उपस्थित होत्या. सेवानिवृत्त झालेले परिसेविका आशा व्यास, मुख्य स्वयंपाकी चंद्रकांत गोसावी, सफाई कामगार संतोष शिंदे आदींनाही यावेळी निरोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

