Homeडेली पल्सफडणवीसांचा झंझावात! 52...

फडणवीसांचा झंझावात! 52 दिवसांत तब्बल 115 सभा!!

यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 52 दिवसांत तब्बल 115 सभांचा धडाका लावला तर याच काळात त्यांनी माध्यमांना 67 मुलाखती दिल्या. 26 मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि आज 18 मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला, तेव्हा भिवंडीत त्यांनी 115व्या सभेला संबोधित केले.

26 मार्चला त्यांची पहिली सभा चंद्रपुरात झाली. सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठीची ही सभा होती. 50वी सभा नांदेड उत्तरमध्ये 22 एप्रिलला झाली. 1 ते 50 सभांचे अंतर पार करायला त्यांना 26 दिवस लागले. 100वी सभा शिवाजीनगर, पुणे येथे 11 मे रोजी झाली. त्यामुळे 51 ते 100 या पुढच्या 50 सभा 15 दिवसांत झाल्या. आज भिंवडीत समारोपाची झालेली सभा ही 115वी सभा होती.

पहिली सभा ते आजची शेवटची सभा असे सलग एकूण 52 दिवस हा प्रचारसभांचा क्रम सुरु होता. या 52 दिवसांत 115 सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण 67 मुलाखती दिल्या. यात 35 मुलाखती मुद्रीत माध्यमांना, 22 मुलाखती इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर 8 मुलाखती डिजिटल माध्यमांना होत्या. 2 मुलाखती राष्ट्रीय साप्ताहिकांना होत्या.

फडणवीस

मोदींनी 10 वर्षांत केलेला विकास, राष्ट्रहित, आर्थिक मुद्दे, देशाच्या सुरक्षाविषयक मुद्दे, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्थानिक विकासाचे मुद्दे, हिंदूत्त्व अशा विविध बाबी त्यांच्या भाषणातून मांडल्या गेल्या. या संपूर्ण 5 टप्प्यात स्थानिक गरजेनुसार, त्यांनी आपले निवासाचे मुख्यालय ठेवले. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात नागपूर हे मुख्यालय होते. तिसर्‍या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे अशा ठिकाणी मुक्काम केले. चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने पुण्यात मुक्काम असायचा. पाचव्या टप्प्यात मुंबईत रात्रीचा मुक्काम केला. कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकार्‍यांच्या बैठका असा क्रम सभांनंतर सुरुच असायचा.

याशिवाय, संतवचन नावाने संतांचे अभंग, ओवींचा आधार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम समाजमाध्यमांतून दररोज एका ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. सुमारे 40 भागांची ही मालिका राहिली, जी 20 मेपर्यंत सुरु राहणार आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content