Saturday, June 22, 2024
Homeबॅक पेजराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३’साठी ऑनलाईन अर्जाची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.

हे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, संस्था आणि विद्यापीठ यांना दिले जातात. मेजर ध्यानचंद खेलरत्न (MDKR) पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार (RKPP) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक पुरस्कारांच्या सूचना मंत्रालयाच्या www.yas.nic.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. या सर्व पुरस्कारांसाठी या सूचनांचे पालन करुन पुरस्कारासाठी पात्र खेळाडू / प्रशिक्षक / संस्था / विद्यापीठांनी १० नोव्हेंबर, २०२३पर्यंत अर्ज सादर करण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत.

ऑनलाईन अर्ज dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास, अर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas@gov.in या संकेतस्थळावर किंवा क्र. ०११-२३३८७४३२ या दूरध्वनीवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपर्क साधता येईल. तसेच, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सहकार्य आवश्यक असल्यास १० नोव्हेंबर २०२३पर्यंत सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या कालावधीत टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-202-5155 आणि 1800-258-5155 उपलब्ध आहेत.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
error: Content is protected !!