Homeचिट चॅट7 आणि 8...

7 आणि 8 डिसेंबरला विनामूल्य करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किट!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट’ 3 डिसेंबरपासून विनामूल्य सुरू झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर आता 7 आणि 8 डिसेंबर 2022, या तारखेला ते विनामूल्य आयोजित केले आहे. या सहलीचा पर्यटनप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

26 नोव्हेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किटचे लोकार्पण करण्यात आले होते. मुंबई सर्किटसाठी आयोजित केलेल्या मोफत दौऱ्यांमध्ये चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ आणि सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाईल. पर्यटकांना सकाळी 9 वाजता दादर शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथून, चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर त्यांना बीआयटी चाळ क्र. 1, खोली क्र. 50/51 याठिकाणी नेले जाईल. या सहलीची सांगता सिद्धार्थ कॉलेज, फोर्ट येथे होईल. दुपारी 2च्या सुमारास दादरच्या गणेश मंदिराजवळ सहलीच्या सुरुवातीच्या ठिकाणी सोडण्यात येईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किटची विनामूल्य सहल सर्वांसाठी खुली आहे. 7 आणि 8 डिसेंबर 2022 रोजी सहलीसाठी दररोज चार बसेस धावणार आहेत. प्रथम येणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करू शकतात. मुंबईत होणाऱ्या या मोफत सहलीचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पर्यटनमंत्र्यांनी केले आहे.

पर्यटनप्रेमींनी गुगल फॉर्म भरून https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeeSj6jP9mAba8zkRt8gPvGP_92TZp3_to_s5LbTxwbZ_GRFg/viewform?usp=sf_link whereas for ऑनलाईन नोंदणी करावी. ऑफलाईन नाव नोंदणीसाठी 7738375812 विक्रम किंवा रसिका 7738375814 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content