Wednesday, October 30, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजरॉनी पी. यांच्या...

रॉनी पी. यांच्या जन्मशताब्दीने नौदलात उत्साह

ऍडमिरल आर. एल‌. परेरा – पीव्हीएसएम एव्हीएसएम यांची सध्या जन्मशताब्दी (जन्म1923 – मृत्यू1993) साजरी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल आणि दार्जीलिंगमधील सेंट जोसेफ स्कूल (नॉर्थ पॉइंट) यांनी शाळेच्या आवारात एकत्रितपणे स्मृतीपर कार्यक्रम नुकतेच आयोजित केले. ऍडमिरल परेरा यांना प्रेमाने ‘रॉनी पी.’ असे म्हटले जाई.

1979मध्ये त्यांनी समर्थपणे नववे नौदलप्रमुख म्हणून धुरा पेलली. 1932-37 या काळात ते दार्जिलिंगमधील या शाळेचे विद्यार्थी होते. ऍडमिरल परेरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेने फुटबॉल स्पर्धा आणि

निबंध लेखन स्पर्धा घेतल्या. यानिमित्ताने शाळेत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि नौदल मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या चमूनेही यात भाग घेतला.

ऍडमिरल परेरा यांच्या जीवनाविषयी सांगत सीडीआर अनुप थॉमस यांनी त्या काळाविषयीही मनोगत व्यक्त केले. सीडीआर गुरबीर सिंग यांनी जवळपास आठशे विद्यार्थ्यांच्या समूहाशी संवाद साधत भारताच्या सागरी इतिहासाची तसेच नौदलात उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या

उत्साहवर्धक संधींची माहिती दिली. उपस्थित नौदल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी तसेच अध्यापकवर्गाशी संवाद साधला आणि भारतीय नौदलात कारकीर्द घडवण्याविषयी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी भारतीय नौदलाने ऍडमिरल परेरा यांच्या स्मरणार्थ शाळेला 2.5 लाख रुपयांचा धनादेश देऊन एक शिष्यवृत्ती सुरू केली तसेच शाळेतील क्रीडानैपुण्याचे कौतुक करण्यासाठी फिरता करंडकही सुरू केला. ऍडमिरल आर. एल. परेरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या नौदल अधिकाऱ्यांनी वृक्षारोपणही केले. शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षक फादर स्टॅन्ले वर्गीस यांनी उपस्थित नौदल अधिकाऱ्यांचा आदरसत्कार केला.

Continue reading

आज वसुबारस!

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. वसुबारस (गोवत्स द्वादशी)- श्री विष्णूच्या...

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...
Skip to content