Thursday, November 7, 2024
Homeचिट चॅटदहावीचा परीक्षा अर्ज...

दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्यातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास येत असलेल्या अडचणींचा विचार करून संबंधित परीक्षा मंडळाने अर्ज भरण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता २५ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरू शकतील.

परीक्षा मंडळाने आज याबाबतचे परिपत्रक जारी केले. यापूर्वी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ११ जानेवारीपर्यंत होती. परिक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी चिंतेत होते. अनेक विद्यार्थी एकावेळेस अर्ज भरत असल्याने सकाळी १० वाजल्यापासून संबंधित वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक आदींनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंडळाने ही मुदतवाढ जाहीर केली. अर्ज भरण्याची प्रक्रियाही मजबूत करण्याचा प्रयत्न मंळाकडून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content