Homeन्यूज अँड व्ह्यूजयंदाच्या पावसातही ठाण्यातल्या...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या ‘आनंदाश्रम’ परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता ठीक वाटतो. परंतु पावसाळ्यात त्याचे खरे स्वरूप उघड झाले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जो पॅसेज निर्माण केलेला आहे तो एकदम बकवास आहे. हा पॅसेज गेल्या काही वर्षांत नव्याने केला गेलाच नसल्याची माहिती आली आहे.

आश्रमाशेजारी पारशी जनसमुदयाचा भूखंड आहे. त्याचे प्रवेशद्वारही रद्दड आहे. लोकनेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस एक नवी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीसाठी काही सुविधा देणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार रस्त्याच्या मधोमध खड्डे खणून या सुविधा देण्यात आल्या. याबाबत आक्षेप नाही. परंतु नंतर हा रस्ता संबंधितांनी जवळजवळ 15/20 दिवस ठीक

केलेला नव्हता. अखेर तो केला गेला. पण तो समतल नाही. त्यामुळे नको तेथे ‘जर्क’ बसत आहेत. आश्रमातून तालावपाळीच्या दिशेने जाणारा फुटपाथ आश्रमाच्या हद्दीपर्यंत उत्तम आहे. मात्र इतरत्र बकवास आहे. महापालिका चालवणाऱ्या पक्षनेत्याला हा सर्वच फूटपाथ चकाचक करायचा होता असे नागरिकांचे मत आहे.

मार्केट सुरु होतानाच्या रस्त्यावर थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबते! गेली अनेकवर्षे यावर उपायच शोधला गेलेला नाही. तीच गत वाहतूक चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानाची झाली आहे. मैदानात तर चिखल आहेच. परंतु प्रवेशमार्गाचीही हालत झालेली आहे. तसेच ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या सॅटिस पुलाखालील रस्त्यावर पाणी तुम्बण्याची समस्या अजूनही सुरूच आहे. (तालावपळीच्या समोरील बाजूस) आता सत्ताकेंद्र असलेल्या आनंदाश्रम परिसरातील उण्यापुऱ्या 100-150 पावलांत महापालिकेच्या अशा कारभाराचा अनुभव येत असेल तर घोडबंदर रोड, कोपरी, माजिवाडा, आनंद नगर, लोकमान्य नगर, कोलशेत, ढोकाळी नाका आदी परिसरात काय अनुभव येत असतील याचा विचारच केलेला बरा!

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content