Homeपब्लिक फिगरअंधेरी स्पोर्ट्स क्लबमधल्या...

अंधेरी स्पोर्ट्स क्लबमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा!

सर्वसामान्य घरातील मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्यातील खेळाडू तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 1988 साली सुरू करण्यात आलेल्या शहाजी राजे क्रीडा संकुलाचा (अंधेरी स्पोर्ट्स क्लब) वापर खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी न करता लग्न समारंभ, इव्हेंट्स व शूटिंगसाठी होत असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केला. तसेच या संकुलाचा कारभार चालवण्यासाठी मे. ललित कला प्रतिष्ठानला दिलेले कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणीदेखिल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच केली.

येथील लग्न समारंभ, इव्हेंट, हॉटेल सर्व बंद करून फक्त आणि फक्त क्रीडा संकुल येथे बनवण्यात यावे. सर्वसामान्य जनतेसाठी आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी हे क्रीडा संकुल सर्व सुविधांसह उपलब्ध करून द्यावे. महापालिकेच्या 14 एकर जागेवर या क्रीडा संकुलाचे खाजगिकरण करून घोटाळे करणाऱ्या संबंधित व्यक्ति व संस्थांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, या क्रीडा संकुलात मल्टिप्लेक्स स्टेडियम होते. क्रिकेट, हँडबॉल, वॉलीबॉल, कबड्डी तसेच इतर मैदानी खेळ खेळले जात होते. आता फक्त फुटबॉल खेळ आहे आणि फक्त फुटबॉलसाठी क्रिकेट, हँडबॉल, वॉलीबॉल, कबड्डी हे खेळ जाणूनबुजून बंद करण्यात आले आहेत. आता फक्त मोठेमोठे लग्न समारंभ, कार्यक्रम, एका राजकीय पक्षाचा कारभार चालतो. डेकोरेटरचा विळखा, त्या माध्यमातून पैशाची कमाई केली जाते. बाहेरून येणाऱ्या खेळाडूंकरिता निवासासाठी ५६ रुमचे खेळाडू वसतिगृह बनवण्यात आले होते. आता त्याचे थ्री स्टार हॉटेल बनवण्यात आले असून त्याठिकाणी ऑनलाईन बुकिंग व्यवस्थाची करण्यात आली आहे. मुंबई मनपाने भाडेपट्टे करारावर दिलेल्या ललित कला प्रतिष्ठानने शहाजीराजे क्रीडा संकुलाचे हॉटेलमध्ये, मॅरेज हॉलमध्ये रूपांतर केले आहे.

सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मॉर्निंग वॉकसाठी केवळ सात ते साडेआठ एवढीच वेळ ठेवली आहे. साडेआठ वाजले की, वॉचमनच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढले जाते. एवढी येथे दादागिरी आहे. तसेच येथे लग्न समारंभ, इव्हेंट असले की, येथे सर्व खेळ बंद ठेवले जातात. या मागणीचे पत्र आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. याबाबत चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला दिले, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content