Homeकल्चर +आनंद घ्या शिष्यवृत्तीधारक...

आनंद घ्या शिष्यवृत्तीधारक कलाकारांच्या कलेचा..

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि  नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या कलाकार विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम येत्या शनिवारी, ११ मे आणि रविवारी, १२ मे रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

यात सहभागी होणाऱ्या गायकांना केंद्राचे शिष्यवृत्तीधारक निनाद कुणकवळेकर तबल्याची साथ करणार असून हार्मोनियमची साथ ओमकार अग्निहोत्री यांची असेल. शनिवारी, ११ मे रोजी सकाळी १० वाजता सावनी पारेकर (गुरु – पल्लवी जोशी), अदिश्री पोटे (गुरु – पल्लवी पोटे), प्राजक्ता शेंद्रे (गुरु – पल्लवी जोशी), सावनी गोगटे (गुरु पं. शुभदा पराडकर) यांच्या गायनाचे सादरीकरण होईल तर रविवारी, १२ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य ( गुरु – स्नेहल फाटक- कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितूत – गायन (गुरु- वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर) आपली कला सादर करतील 

सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content