Homeकल्चर +‘जय स्वच्छमेव जयते...

‘जय स्वच्छमेव जयते बोला’ येत्या १८ मार्चला मराठी ओटीटीवर

संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. हे दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ येत्या १८ मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

आपल्या मोठ्या बहिणीला प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी नुपूरने आखलेली योजना यशस्वी होईल का, हे रेडीमिक्स चित्रपटात तर गोगलगावातील लोकांना घाणीतून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी अनासपूरेंची योजना यशस्वी होईल का, हे जय स्वच्छमेव जयते बोला, या

चित्रपटात बघता येणार आहे. ‘रेडीमिक्स’ चित्रपटात वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार असून मकरंद अनासपूरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते  बोला’ चित्रपटात आपल्या विनोदी ढंगाने समाजासाठी एक गंभीर संदेश दिला आहे.

समाजात मनोरंजन महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर समाजाचं प्रबोधनही तेव्हढंच महत्त्वाचं आहे. मनोरंजनातून प्रबोधन करणारे रेडीमिक्स आणि जय स्वच्छमेव जयते बोला हे चित्रपट प्रेक्षकांना देताना मनात एक उत्स्फूर्त भावना आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content