Homeकल्चर +शनिवार-रविवारी आनंद घ्या...

शनिवार-रविवारी आनंद घ्या ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’चा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. या वर्षी हा महोत्सव येत्या शनिवार व रविवारी म्हणजेच ७ आणि ८ ऑक्टोबरला ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दि. ७ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत लिहिले आहेत. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळेल. उदयन् आचार्य नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

रविवार दि. ८ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुधीर महाबळ हे ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीबद्दल बोलतील. वारी आणि परतवारीवरही ते आपले अनुभव कथन करतील. इलेक्ट्रॅानिक्स इंजिनिअर असलेल्या महाबळ यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम केले आहे. आवड म्हणून ते अनेक वर्षं वारी आणि परतवारी करीत असून त्यांच्या “परतवारी” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले या वातानुकूलित सभागृहात ही व्याख्याने होतील. अधिक माहितीसाठी संपर्क- २४३०४१५०

Continue reading

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले ‘मोदीज मिशन’चे प्रकाशन

बर्जिस देसाई लिखित "मोदीज मिशन" या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजभवन येथे आज झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारताचे...

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...
Skip to content