Friday, October 18, 2024
Homeएनसर्कलहवाई दलाची आपत्कालीन...

हवाई दलाची आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाईन सेवा सुरू

भारतीय हवाई दलाच्या (IAF) सेवेत कार्यरत देशभरातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि निश्चित वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी बेंगळुरूमधल्या एअर फोर्सच्या कमांड हॉस्पिटल येथे भारतीय हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या हस्ते इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स सिस्टमचे (ईएमआरएस) नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

ईएमआरएस ही भारतीय हवाई दलाचे देशभरातली कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना 24/7 टेलिफोनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आलेली अशा प्रकारची पहिलीच हेल्पलाईन आहे. देशभरात कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या कॉलरना, म्हणजेच भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्वरित प्रतिसाद देत, त्यांना वैद्यकीय आणि निमवैद्यकीय व्यावसायिकांच्या पथकाद्वारे मदत पुरवणे, हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. प्रतिसाद देणारा वैद्यकीय व्यावसायिक कॉलरला त्वरित सल्ला देईल आणि त्याचवेळी कॉलरच्या जवळच्या भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय सेवा केंद्राशी संपर्क साधेल. ही सुविधा आणीबाणीच्या परिस्थितीत उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या भारतीय हवाई दलाच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. मौल्यवान प्राण वाचवणे, हे ईएमआरएसचे एकमेव उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमात प्रणालीची क्षमता आणि पोहोच यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अडचणीत सापडलेल्या कॉलरला तज्ज्ञांचे मार्गदर्शन किती सहजतेने प्रदान केले जाईल, तसेच जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्राच्या वैद्यकीय सहाय्य पथकाची सेवा तत्काळ कशी मिळवता येईल, यावर माहिती देण्यात आली.

ही संकल्पना मांडणाऱ्या हवाई दलप्रमुखांनी (CAS) ईएमआरएस चे महत्त्व अधोरेखित केले आणि ते म्हणाले की, हा उपक्रम भारतीय हवाई दलासाठी केवळ एक महत्त्वाचा टप्पा नसून, वैद्यकीय सज्जतेमधील मोठी प्रगती आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, तज्ज्ञांद्वारे वैद्यकीय सेवा तत्काळ प्रदान करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे पुढील पाऊल आहे.

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content