Homeपब्लिक फिगरबारामतीतली निवडणूक मोदीविरूद्ध...

बारामतीतली निवडणूक मोदीविरूद्ध राहुल गांधी!

बारामतीचा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केले.

पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर येथील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. भारताला व महाराष्ट्राला विकसित बनवून देशातील सर्व घटकांमधील लोकांना पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल. आपला अजेंडा मान्य असणाऱ्यांना सोबत घेऊन आपण मोदींची ताकद वाढविली पाहिजे. हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारले आहे, असे ते म्हणाले.

मुळशी धरणाचे पाणी दौंड आणि इंदापूर तालुक्यात आणण्याचे तसेच खडकवासला बोगदा पूर्ण करून दरवर्षी 3 टीएमसी पाणी दौंड आणि इंदापूरला आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या ध्येयासाठी काम करून जनतेच्या आशीर्वादाने हा भाग सुजलाम सुफलाम करणार. जनतेच्या समस्यांचे समाधान कृतीमधून झालेले पाहायला मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. राहुल कुल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content