सिंगापूरच्या मोहना कारखानीस लिखित ‘एका’, ही कादंबरी आणि ‘जाईचा मांडव’ व ‘पैंजण’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत एव्हरशाईन हॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे नुकताच करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मीना नाईक, प्रा. जाई म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर तसेच डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते. सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले. प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, लता गुठे, संजीवनी समेळ, संगीता अरबुने, कौतुक मुळे, फरझाना इकबाल आणि संजय कारखानीस इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

