Homeब्लॅक अँड व्हाईट'इझमायट्रिप'चा विमा क्षेत्रात...

‘इझमायट्रिप’चा विमा क्षेत्रात प्रवेश!

इझमायट्रिपडॉटकॉम, या भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपली नवीन उपकंपनी इझमायट्रिप इन्‍शुरन्‍स ब्रोकर प्रायव्‍हेट लिमिटेड लाँच केली आहे. आपल्‍या सेवा पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणण्‍यासाठी आणि ग्राहकांच्‍या गरजांचे निराकरण करण्‍याकरिता विशेषीकृत उत्‍पादन निर्माण करत विमा बाजारपेठेत प्रवेश करण्‍यासाठी कंपनीने उचललेले हे धोरणात्‍मक पाऊल आहे.

नवीन उद्यम उद्योगामधील इझमायट्रिपचे स्‍थान अधिक दृढ करण्‍याची आणि इझमायट्रिपच्‍या स्‍वत:च्‍या २० दशलक्ष युजरवर्गासह ७.९ ट्रिलियन रूपये बाजारपेठेची पूर्तता करण्याची अपेक्षा आहे. विमा ब्रोकरेज क्षेत्रात प्रवेश करत कंपनीचा आपल्‍या सेवा पोर्टफोलिओमध्‍ये वाढ करण्‍याचा, तसेच व्‍यवसाय कार्यसंचालने व महसूल वाढवण्‍यासाठी नवीन मार्ग स्‍थापित करण्‍याचा मानस आहे.

इझमायट्रिप इन्‍शुरन्‍स ब्रोकर प्रायव्‍हेट लिमिटेड ब्रॅण्डअंतर्गत विशिष्‍ट कंपनी म्‍हणून समाविष्‍ट करण्‍यात आली आहे. ईटीपीएलचे प्रवर्तक निशांत पिट्टी यांना नवीन स्‍थापना करण्‍यात आलेल्‍या उपकंपनीमध्‍ये संचालकपद देण्‍यात आले आहे. त्‍यांचे नेतृत्त्‍व आणि कौशल्‍य कंपनीला विमा क्षेत्रात यशाच्‍या दिशेने घेऊन जाण्‍यास मार्गदर्शन करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल. 

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक निशांत पिट्टी म्‍हणाले की, आम्‍हाला इझमायट्रिप इन्‍शुरन्‍स ब्रोकर प्रायव्‍हेट लिमिटेडच्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. ही नवीन उपकंपनी आमच्‍यासाठी प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यामधील प्रमुख पाऊल आहे, जेथे आम्‍ही आमच्‍या सेवांमध्‍ये विविधता आणत विमा बाजारपेठेत प्रवेश करत आहोत. आमचा ग्राहकांना परिपूर्ण ट्रॅव्‍हल इकोसिस्‍टम प्रदान करण्‍याचा मानस आहे आणि हा नवीन उद्यम त्‍याच दिशेने उचलण्‍यात आलेले पाऊल आहे. सर्वोत्तमता व ग्राहक समाधानाप्रती आमच्‍या प्रबळ प्राधान्‍यासह आम्‍हाला विश्‍वास आहे की, आम्‍ही आमच्‍या विद्यमान व नवीन ग्राहकांवर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करू.

इझमायट्रिप इन्‍शुरन्‍स ब्रोकर प्रायव्‍हेट लिमिटेडचा नाविन्‍यता आणि क्‍लायण्‍टकेंद्रित मानसिकतेच्‍या माध्‍यमातून विमा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा प्रयत्न आहे. प्रगतीशील व गतीशील ब्रॅण्‍ड म्‍हणून इझमायट्रिपच्‍या प्रतिष्‍ठेने सर्वसमावेशक विमा सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती कंपनीची समर्पितता अधिक दृढ केली आहे, जेथे हे सोल्‍यूशन्‍स गाहकांसाठी काळाच्‍या गरजेची पूर्तता करतील.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content