इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने ईट्रॅव्ह टेक लिमिटेडमध्ये धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ईट्रॅव्ह टेक लिमिटेडच्या ४.९१ टक्के (वाटपानंतर) देय भरलेल्या इक्विटी शेअर भांडवलाचा समावेश आहे. ब्रँडच्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या विस्तारीकरण धोरणाचा भाग म्हणून कंपनीने या संपादनाला रोख करारामध्ये बदलले आहे.
ईट्रॅव्ह टेक लिमिटेड फ्लाइट एपीआय व हॉलिडे पॅकेजेसपासून हॉटेल एपीआय, व्हाइट लेबल, बस एपीआय आणि व्हिसा अॅप्लिकेशन्सपर्यंत प्रवासाशी संबंधित सेवांची वैविध्यपूर्ण श्रेणी देते. या धोरणात्मक गुंतवणुकीमागे अल्पसंख्यांकाचे हित साधण्याचा आणि इझमायट्रिपच्या बी२बी विभाग ऑफरिंग्जना प्रबळ करण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या कॉर्पोरेट ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता होईल.

इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक निशांत पिट्टी म्हणाले की, आमचा नॉन-एअर विभागातील आमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा मानस आहे. हॉटेल्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आमचा आता कॉर्पोरेट ग्राहकांसाठीच्या सेवांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे आणि ईट्रॅव्ह टेक लिमिटेडसोबतची गुंतवणूक या उद्देशामध्ये महत्त्वाची ठरेल. त्यांच्या टेक क्षमता आणि बी२बी ग्राहकांसोबत व्यवहार करण्यामधील कौशल्याचा फायदा घेत आम्हाला कॉर्पोरेट ग्राहकांना सुधारित ऑफरिंग्जसह उत्तम सेवा देण्याचा विश्वास आहे. यासारखे धोरणात्मक निर्णय आमच्या प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण आहेत आणि नाविन्यता व तंत्रज्ञानाच्या पाठबळासह ग्राहकांना एकसंधी प्रवास अनुभव देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला दृढ करतात.
ईट्रॅव्ह टेक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हेनिल रूपारेलिया म्हणाले की, आम्हाला पर्यटन क्षेत्रातील प्रख्यात कंपनी इझमायट्रिपसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. नॉन-एअर विभागांमध्ये विविधता आणण्यावर त्यांचे धोरणात्मक अवधान विस्तारीकरण व नाविन्यतेप्रती आमच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे. आमच्या टेक क्षमता व बी२बी कौशल्यांसह इझमायट्रिपच्या गुंतवणुकीला एकत्रित करत आमचा कॉर्पोरेट ग्राहकांना अद्वितीय सेवा देण्याचा इरादा आहे. या सहयोगामधून तंत्रज्ञान व ग्राहक-केंद्रितपणाचे पाठबळ असलेले एकसंधी प्रवास अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.