Homeचिट चॅटश्री मावळी मंडळाच्या...

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले.

महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा. फ. नाईक संघावर १०-०८ असा २ गुण व १:१० मिनिटे राखून विजय मिळविला. ज्ञानविकास फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून संरक्षणाची निवड केली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाकडे ०५-०५ असे समसमान गुण होते. ज्ञानविकास फाउंडेशन संघाच्या धनश्री कंक (२:४० मि . व १ गुण, ३:२० मि . व १ गुण), दिव्या गायकवाड (२:२० मि. व ३ गुण) व रोशनी जुनघरे (१:४० मि. व १ गुण, २:२० मि.) यांनी संघाला विजय मिळवून देण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले. पराभूत संघाकडून श्वेता जाधव (१:१० मि. व ३ गुण), रुपाली बडे (२:४० मि. , १:४० मि.) व गीतांजली नरसाळे (१:३० मि., ०३:५० मि. ) यांनी चांगला खेळ करीत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.

पुरुष गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या विहंग क्रीडा केंद्र संघाने मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघावर १५-१० असा ०५ गुणांनी विजय मिळविला. विहंग क्रीडा केंद्र संघाने नाणेफेक जिंकून संरक्षणाची निवड केली. मध्यंतरापर्यंत विहंग क्रीडा केंद्र संघाने आक्रमक खेळ करीत ०८-०४ अशी ०४ गुणांची आघाडी घेतली. विहंग क्रीडा केंद्र संघाच्या आशिष गौतम (१:५० मि. व ०१ गुण , १:५० मि. व ०२ गुण), आकाश तोगरे (२:४० मि., २:३० मि.), लक्ष्मण गवस (२:०० मि. व ०३ गुण , ०१ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर, शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघाच्या रामचंद्र झोरे (०२:०० मि., ०२:०० मि. व १ गुण), धीरज भावे (१:०० मि. व १ गुण, १:४० मि. व १ गुण) व प्रतीक देवरे (१:१० मि., १:५० मि.) यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.

स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे उमेश साळवी (सेवानिवृत्त न्यायाधीश – मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते झाला. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, चिटणीस रमण गोरे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, खजिनदार रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त कृष्णा डोंगरे, पॅट्रिक फर्नांडीस, रवींद्र आंग्रे, केशव मुकणे हेदेखील उपस्थित होते.

स्पर्धेतील पारितोषिके:

महिला गट:

अंतिम विजेता: ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे)

अंतिम उपविजेता: रा. फ. नाईक संघ (ठाणे)

तृतीय क्रमांक: शिवभक्त स्पोर्ट्स क्लब (ठाणे)

चतुर्थ क्रमांक: शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर)

उत्कृष्ट संरक्षक: दिव्या गायकवाड (ज्ञानविकास फाउंडेशन संघ)

उत्कृष्ट आक्रमक: श्वेता जाधव (रा. फ. नाईक संघ)

अष्टपैलू खेळाडू: धनश्री कंक (ज्ञानविकास फाउंडेशन संघ)

पुरुष गट:

अंतिम विजेता: विहंग क्रीडा केंद्र (ठाणे)

अंतिम उपविजेता: शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर)

तृतीय क्रमांक: सरस्वती क्रीडा केंद्र (मुंबई शहर)

चतुर्थ क्रमांक: ग्रिफिन जिमखाना (ठाणे)

उत्कृष्ट संरक्षक: रामचंद्र झोरे (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी)

उत्कृष्ट आक्रमक: आशिष गौतम (विहंग क्रीडा केंद्र)

अष्टपैलू खेळाडू: आकाश तोगरे (विहंग क्रीडा केंद्र)

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content