Homeडेली पल्स10वी - 12वीच्या...

10वी – 12वीच्या परीक्षेच्या काळात केंद्रांवर ठेवा सॅनिटरी पॅड्स

इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना मासिक पाळीला सामोरे जाण्याकरीता परीक्षा केंद्रांवर विनामूल्य सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज तसेच केंद्रशासित प्रदेशातल्या शिक्षण मंडळांना दिले आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने इयत्ता 10वी व 12वीच्या शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या काळात मासिक पाळीच्या वेळी आरोग्य-स्वच्छता व्यवस्थापनाबाबत कृतीशील उपाययोजना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थिनींचे आरोग्य, प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि संबंधित कारणांमुळे त्यांच्या शैक्षणिक यशावर परिणाम होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे परीक्षेच्या कालावधीत मासिक पाळीदरम्यान लागणाऱ्या आरोग्यविषयक साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीच्या सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे-

  • सॅनिटरी पॅडच्या पुरवठ्याची तरतूद- 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्रांवर सॅनिटरी पॅड विनामूल्य उपलब्ध करून दिली जावीत. परीक्षेच्या दरम्यान गरज भासल्यास विद्यार्थिनींना ती सहज मिळावीत, असे नियोजन असावे.
  • रेस्टरूम विराम- मासिक पाळीदरम्यान आवश्यक असल्यास रेस्टरूम/स्वच्छतागृहासाठी विराम घेण्याची परवानगी विद्यार्थिनींना दिली जावी.
  • संवेदनशीलता व जागरूकता वाढीसाठी कार्यक्रम– राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी मासिक पाळीदरम्यान आरोग्याच्या व्यवस्थापनाविषयी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामुळे मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यास आणि शाळेत विद्यार्थिनींना या बाबतीत सोयीस्कर वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.

परीक्षांच्या काळात मासिक पाळीविषयक आरोग्याच्या मुद्याकडे लक्ष पुरवत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने विद्यार्थिनींना मासिक पाळीसंदर्भातल्या आवश्यकतांच्या संदर्भात प्रतिष्ठेची व आदराची वागणूक देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यातून विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात त्यांची संपूर्ण शैक्षणिक क्षमता योग्यप्रकारे वापरता येईल.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content