Wednesday, February 5, 2025
Homeटॉप स्टोरीमोदी सरकारच्या काळात...

मोदी सरकारच्या काळात 12 हजार कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

अंमली पदार्थांना आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल तीन ध्वनी-चित्रफिती जारी केल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर याबाबत टिप्पण्यांची आणि ध्वनी-चित्रफितींची मालिका जारी केली आहे. मोदी सरकारच्या काळात अंमली पदार्थविरोधी यंत्रणांनी 12 हजार कोटी रुपयांचे 12 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट केले. 

अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. या संदर्भात अटक केलेल्यांच्या संख्येत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, ही या धोरणाची फलनिष्पत्ती आहे, असे शाह यांनी आपल्या एका टिप्पणीत म्हटले आहे.

अँमली

दुसऱ्या एका टिप्पणीत शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि गुन्हे प्रतिबंधक संस्था यांच्यातील समन्वय, सहकार्य आणि सहयोगाद्वारे, अंमली पदार्थविरोधी एक देशव्यापी अभेद्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. या रणनीतीमुळे अंमली पदार्थांची जप्ती आणि गुन्ह्यांची नोंद, यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाह म्हणाले की, #DrugsfreeBharat (अंमली पदार्थमुक्त भारत) ही मोहीम, आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली, अंमली पदार्थांचा शोध घेणे, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करत गुन्हेगारांना अटक करणे याद्वारे आपला देश लक्ष्य वेगाने साध्य करत आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण जवळपास 100%नी वाढले आहे आणि या प्रकरणांतील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 152%नी वाढ झाली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2006 ते 2013 या कालावधीत 1257 गुन्ह्यांची नोंद झाली असून ही संख्या 2014-2023 या कालावधीत तिपटीने वाढून 3755 वर पोहोचली आहे.

अँमली

2006-13 या कालावधीमधील अटक झालेल्यांच्या 1363च्या तुलनेत, 2014-23 या कालावधीमध्ये अटकेच्या प्रमाणात चौपट वाढ होऊन ही संख्या 5745पर्यंत पोहोचली आहे. 2006-13 या कालावधीत जप्त केलेल्या 1.52 लाख किलो अंमली पदार्थांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण दुपटीने वाढून 3.95 लाख किलो इतके झाले आहे. मोदी सरकारच्या काळात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 2006-13 या कालावधीतील 768 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 पटीने वाढून 22,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जून 2023पर्यंत, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-NCBने अशा 23 प्रकरणांमध्ये आर्थिक तपास करुन, 74,75,00,531 रुपये किंमतीची मालमत्ता गोठवली आहे.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content