Homeचिट चॅटदोन छुप्या अंमली...

दोन छुप्या अंमली पदार्थ निर्मिती केंद्रांवर डीआरआयचा छापा

डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन छुप्या मेफेड्रोन निर्मिती केंद्रांवर धाडी टाकून तेथील अंमली पदार्थविषयक जाळे उद्ध्वस्त केले आणि ही केंद्रे चालविणारा आणि त्यासाठी पैसा पुरविणारा मुख्य आरोपी ताब्यात घेतला.

या धाडीत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काळ्या बाजारात 49.77 कोटी रुपयांची किंमत असणारे,  वापरास तयार स्वरूपातील 24.885 किलो मेफेड्रोन, या निर्मिती प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले 18.90 रुपये, महत्त्वाचा कच्चा माल, यंत्रे आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त केली.

विशिष्ट गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेगवान तसेच उत्तम प्रकारच्या समन्वयासह 21 डिसेंबर 2022 रोजी ही मोहीम राबविली आणि अंमली पदार्थ निर्मिती करणारी दोन केंद्रे उद्ध्वस्त केली. या दोन्ही ठिकाणी काम करत असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तत्काळ केलेल्या पाठपुराव्यातून, ही केंद्रे चालविणारा आणि त्यासाठी पैसा पुरविणाऱ्या मुख्य आरोपीला 60 लाख रुपयांच्या रोख रकमेसह नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गोरखपूरमधून ताब्यात घेण्यात आले.

अंमली पदार्थ तस्करीविषयक प्रकरणांमधील मुख्य सूत्रधार आणि कारस्थानी तसेच यासाठी पैसा पुरविणारे यांना पकडण्यावर जोर देत, केंद्रीय गृह मंत्री तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही समन्वयीत मोहीम पार पाडण्यात आली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content